तिरुपती बालाजी येथे वेणीदान करण्याची एक प्रथा आहे. लहानपणी मी पाहिले आहे. आदल्या दिवशी भरजरी साड्या. दागिने. लांब लचक वेणी त्यात अबोलीचा मोठा गजरा. कपाळावर उभे कुंकू लावणारी बाई दुसर्या दिवशी चक्क डोक्याची चंपी म्हणजे गोटाच. बाकीचे सगळे तसेच. पुरुष आणि बाई दोघेही मुलामुलीसह असे करायचे. ते पाहून मला वाटायचे की आपल्या कडे वैधव्य आलेल्या बाईचे केशवपन करतात. आणि किती जाचक अटी असतात त्यांना. यातून सुटका होण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला होता. आता असे नाही. त्या वेणीदानाने गंगावन करण्याचा एक व्यवसाय होता. तर गयेला त्रिवेणी संगमावर एक धार्मिक विधी करतात. नदीत नावेत बसून. नवऱ्याच्या पुढ्यात बायको बसते. आणि वेणी च्या खालच्या भागात तीन बोटाच्या मापाने कात्रीने नवरा बायकोचे वेणीदान नदीत विसर्जन करतो..
तिरुपती येथे परंपरा आणि नवस याकरिता वेणीदान करतात. पण गयेचे माहित नाही. केस हे माणसाचे विषेश करुन स्त्रीचे सौंदर्य आहे. त्यामुळे काळे लांब सडक केस आणि त्याचे विविध प्रकारच्या केसशृगांराचे फार मोठे शास्त्र आहे. केवड्याची वेणी. फुलांची वेणी. दागिन्यांचा वापर करून वेणी. रोजचा कोपा. त्यावर सोन्याचे फूल आणि वरुन गजऱ्या एक प्रकारचा आकडा लावून केलीली सजावट असते. काळ बदलला तशी केस रचना पार बदलून गेली. काटाकाटी करत. अमूक कट तमूक कट अशी नांवे आहेत…. पण सर्वात मला ते शोल्डर कट आणि कपाळावरचे सारखे केस मागे करणे अजिबात आवडत नाही. हो मला माहित आहे की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हे आहे की ते केसात सारखे हात. बोट फिरवून हात धूत नाहीत म्हणून. आणि लक्ष केंद्रित होते एक सारखे. आता ही बट पुढे कधी येणार आहे आणि कामातला हात कधी तिकडे जाणार यात. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ असते….
पण आताच्या पिढीत केसांची समस्या अनेक जणांना आहे. अगदी लहान वयातच टक्कल पडते. नैराश्य येते. लग्नाच्या वेळी अडचण येते. तर कॅन्सर मध्ये सर्व केस गळून जातात आणि रुग्णाला आणखीनच नैराश्य येते. कुणीही भेटायला येऊ नये असे वाटते खर तर जन्मत:असणारे केस म्हणजे जावळ किती शोभून दिसतात बाळांना. अगदी रेशमा सारखे मुलायम म्हणून गोजिरवाणे दिसतात लेकरं. काहीं बाळांना एक ही केस नसतो. अगदी गुळगुळीत तांब्याच. खर तर केस आणि ते ही लांब दाट एक नैसर्गिक देणगी आहे. आता जो नवीन आजार कॅन्सर झाला की त्यात सगळे केस जातात आणि ती व्यक्ती निराश होते. पण विग मुळे एक प्रकारचा आत्मविश्वास येतो म्हणून नतंर केसांचा विग वापरावा लागतो. यासाठी केसदान हे एक दान आता गरजेचे आहे. त्यामुळे टक्कल पडणाऱ्यांची व आजारी माणसांची सोय होते. कधी कशाला कशासाठी महत्त्व येईल हे सांगता येत नाही म्हणून केसदान करा आणि म्हणा की.
बाल लगाईये. स्टाईल बनाईये. बघा कसे हसतात. विग लावून स्टाईल करुन
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply