वेशभूषा आगळी वेगळी
प्रकाश दिसता मिळते झळाळी
परी सौंदर्य बिघडते अवकाळी
संकटे येती घरा!!
अर्थ–
परकीय वेशभूषा आत्मसात करावी जरूर, पण त्याने आपल्या संस्कृतीला बाधा पोचत नाही ना याचा विचार व्हायला हवा. आजकाल चे तरुण- तरुणी विदेशी नट नट्या, पॉप सिंगर यांच्या कडे ओढले जातायत. त्यांची कला आत्मसात करण्या पेक्षा त्यांचे राहणीमान, वेशभूषा, केशभूषा आपल्यात आणायला पाहतात. पण विदेशी सगळेच तसे रहातात अगदी 5 वर्षाची मुलगी ते 80 वर्षाची बाई अगदी सगळेच. आपल्याइथे ते बघितले जात नाही. त्यांना सवय आहे किंवा त्यांना वेगळे काही वाटत नाही. पण आपल्या इथे मात्र कोणा बाईने किंवा तरुणीने असे काही कपडे घातले की सगळा समाज मात्र त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो आणि मग पुढे काय होऊ शकते याची वाच्यता न केलेली बरी कारण ती गोष्ट मरेपर्यंत फाशी ही शिक्षा दिली तरी कमी होईल की नाही याची शक्यता नाही.
आपली संस्कृती, वेशभूषा, समाजात रहाण्याची पद्धत यांना डावलून काहीतरी आचरट घालणे आणि त्याला फॅशन च्या नावाखाली बढावा देणे याचे दुष्परिणाम आपण भोगतोय. विचार प्रत्येक घरी व्हायलाच हवा. संकट विचारून येत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply