दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात.
खरं तर वेश्या आणि राजकारणी यांची तुलना करून मी वेश्यांचा अपमान करतोय याची मला जाणीव आहे. वेश्या -बळजबरीने वा नाईलाजाने- एकदा का या ‘धंद्या’त आल्या, की त्या आयुष्यभर या ‘व्यवसाया’शी प्रामाणिक राहातात..करत असलेल्या ‘धंद्या’शी प्रामाणिक राहातात व राजकारणी मात्र लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण या ‘व्यवसाया’त येतात आणि प्रत्यक्षात मात्र लोकांवर बलात्कार करण्याचा ‘धंदा’ करतात..
सर्व प्रकारचे व्यवसाय-धंदे करणारे लोक त्या त्या व्यवसायात आवश्यक असणारी एक किमान नैतिकता पाळतात. परंतू राजकारण हा एकच व्यवसाय असा आहे की इथे कुणी नैतिकता पाळली, की ती व्यक्ती या ववसायातून बाहेर गेलोच म्हणून समजा..नैतिकता नसणे ही एकमेंव अट राजकारणासाठी लागते असा माझा समज गेल्या काही वर्षांत दृढ झाला आहे..आणि तो बरोबर आहे हे दिवसेंदिवस चाललेल्या तमाशावरून (तमाशाचा अपमान करायची इच्छा नाही, आता हा शब्द आठवला म्हणून उल्लेख केला एवढंच..! माफी असावी.) सिद्ध होत आहे.
— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply