स्मरणीय भूमिका करणार्या अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला.
चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.
सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.
त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले.
१९३० च्या दशकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.
चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्याजोगा होता.
या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यायत आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद ‘दुर्गा खोटे’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- वेब दुनिया/ विकिपीडिया
Leave a Reply