श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असे होते. निर्देशक विजय भट्ट यांनी ते नाव बदलून श्यामा हे नाव ठवले. श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये काम केले होते.
श्यामा यांचा जन्म ७ जून १९३५ रोजी लाहोर येथे झाला होता. १९५३ साली त्यांनी दिग्दर्शक फली मिस्त्री यांच्याशी लग्न केले. १९५० आणि १९६० च्या दशकात श्यामा या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. . ‘आर पार’, ‘बरसात की रात’ आणि ‘तराना’ या चित्रपटांसाठी श्यामा यांना आजही ओळखले जाते.
श्यामा यांनी सावन भादो, दिल दिया दर्द लिया, मिलन, शारदा या चित्रपटातही अभिनय केला होता. शारदा चित्रपटासाठी त्यांना सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
श्यामा यांची गाणी ‘ऐ दिल मुझे बता दे’, ‘ओ चांद जहां वो जाए’, ‘ऐ लो मैं हारी पिया’, ‘देखो वो चांद छुप के करता है क्या इशारे’, ‘जा रे कारे बदला’ खूप प्रसिद्ध झाली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply