ज्येष्ठ निर्माते जी. पी. सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १४ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.
भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. त्यानंतर ते वकिल झाले.
सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली.
शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल.
जी. पी. सिप्पी यांचे २५ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply