नवीन लेखन...

काँग्रेसचे जेष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ
यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते.

विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते. विठ्ठलराव गाडगीळ हे १९७५ ते १९७७ या काळात इंदीरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री राहिले होते, राजीव गांधींच्या कारकिर्दीत “माहीती आणि नभोवाणी” खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते.

विठ्ठलराव गाडगीळ यांनी विवीध वृत्तपत्रातून वेळोवेळी लेखन केले ते “संसदमार्ग – लोकशाहीचा राजमार्ग” (लेखक: विठ्ठलराव गाडगीळ, प्रकाशकः प्रेस्टीज प्रकाशन) या ग्रंथात संकलीत झाले.

ग.प्र. प्रधान यांच्या मतानुसार “लोकशाहीच्या राजमार्गावरील विवीध संघर्षांचे,घटनांचे घटनांमागील विचार प्रवाहांचे वर्णन विवेचन आणि विश्लेषण विट्ठलराव गाडगिळांच्या लेखनातून झाले असून , खासदार आणि मंत्र्यांच्या आधीकार कक्षा आणि मर्यादांचे पैलू गाडगीळांच्या लेखनात येतात परंतु इंदिरा गांधींची कार्यपद्धती आणि आणीबाणी विषयी लेखन करताना ग.प्र. प्रधानांच्या मतानुसार विट्ठालराव गाडगीळांची लेखणी अडखळत असे.

विठ्ठलराव गाडगीळ यांचे ६ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..