ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला.
रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट मधून रॉजर मूर यांनी अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले होते. ब्रिटीश अभिनेते रॉजर मूर यांनी १९५४ साली आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरूवात केली. त्याआधी काही जाहिरांतीसाठी मॉडेलिंगचे काम केले. बॉण्डपटातील भूमिकेमुळे त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला होता. रॉजर मूर यांनी सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजर मूर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ या सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते. ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३ पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती.
रॉजर यांनी जेम्स बॉँड चित्रपटाव्यतिरिक्त गुप्तहेर या संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रसिद्धी टीव्ही सिरीज ‘दि सेंट’ यामध्येही काम केले. या सिरीजमधील त्यांचा ‘सायमन टेंपलर’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांनी अनेक चित्रपट व टिव्हीवरही भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत तसेच युनिसेफसाठी सदिच्छा दूत म्हणूनही १९९१ साली त्यांची निवड झाली होती.
रॉजर मूर यांचे २३ मे २०१७ रोजी निधन झाले.
रॉजर मूर यांनी जेम्स बॉन्ड म्हणून भूमीका केलेले चित्रपट.
लिव्ह अॅण्ड लेट डाय, द मॅन वुईथ द गोल्डन गन, द स्पाय व्हू लव्हड मी, मूनरेकर, फॉर यूवर आईज ओन्ली, आक्टोपसी, अ व्ह्यू टु किल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply