ज्येष्ठ गीतकार तन्वीर नकवी यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९७२ रोजी लाहोर येथे झाला.
तन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले.
तन्वीर नकवी यांनी प्रसिद्ध गायीका आणि अभिनेत्री नूरजहांची बहीण ईदान बाईशी लग्न केले होते. त्याच्या कारकिर्दीतील मोठ्या हिट चित्रपटात मेहबूब खानच्या म्युझिकल हिट अनमोल घडी आणि जुगनु यांचा समावेश आहे जो त्या वर्षातील प्रत्येक सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.
फारच लोकांना माहिती आहे की मोहम्मद रफी यांचा परिचय तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत केला होता. गीतकार म्हणून त्यांना खूप मागणी होती. पण फाळणीनंतर तन्वीर नकवी पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्याआधी ते १५ वर्षांहून अधिक काळ ते उर्दू आणि पंजाबी चित्रपटांमधील अग्रगण्य म्हणून काम करत राहिले.
१९६५ च्या युद्धाच्या काळात “रंग लायेगा शहीदों का लहू” या काळात नूरजहांने गायलेला त्यांचा देशभक्तीचे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले होते. ‘सुनहरे सपने’ या शीर्षकाखाली त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे.
तन्वीर नकवी यांचे १ नोव्हेंबर १९७२ रोजी लाहोरमध्ये निधन झाले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply