नवीन लेखन...

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार बाबुराव गोखले

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.

बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!

नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.

पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.

फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा ‘वारा फोफावला’ हा कवितासंग्रह, ‘करायला गेलो एक’, ‘ संसार पाहावा मोडून’, ‘अन् झालं भलतंच’, ‘नवरा म्हणून नये आपला’, ‘रात्र थोडी सोंगे फार’ इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.

बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

7 Comments on मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार बाबुराव गोखले

  1. गुलशन नंदा यांच्या “कटी पतंग”या हिंदी कादंबरीवर आधारित ” पतांगापरी जीवन माझे” हे नाटक आणि दुसऱ्या एका कादंबरीवर आधारित ” ते तसे तर मी अशी ” ही दोन नाटके तसेच ग दी माडगूळकर लिखित * परचक्र * श्री स्टार्स तर्फे रंगमंचावर आणली होती.

  2. बाबुराव गोखले यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले होते
    १ वारा फोफावला
    २ माझी भाव गीते

  3. करायला गेलो एक नाटकाच्या पहिल्या प्रयोगात भाऊ बिवलकर यांनी हरिभाऊ ही भूमिका सादर केली नव्हती. ती राजा गोसावी यांनी सादर केली होती. अनेक नामवंत कलाकारांनी ही भूमिका साकार केल्यावर सुमारे १० वर्षांनी भाऊ बिवलकर यांनी ही भूमिका केली होती

  4. श्रीस्टार्स तर्फे पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या वर्हाडी मानस या नाटकाचे सडे तीनशे च्या वर प्रयोग केले आहेत. ते अत्रे pictures च्या चार सिनेमांचे नायक होते आणि त्यांनी तीस च्या वर मराठी चित्रपटांचे पद्य लेखन केक आहे. पहिली मंगळागौर या चित्रपटातील ” नटली चैत्राची नवलाई ” हे त्यांनी लिहिलेले गाणे हे स्वरासाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायकेले पाहिले गाणे आहे

  5. यात बरीचशी माहिती द्यायची राहिली आहे व थोडीशी चुकीची आहे

      • बाबुराव गोखले यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले होते
        १ वारा फोफावला
        २ माझी भाव गीते

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..