नवीन लेखन...

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९५७ रोजी लातूर जिल्ह्यातील मेकगाव येथे झाला.

तात्याराव लहाने यांनी ‘कमवा व शिका’ या योजने अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून १९८१ मध्ये मेडिसीन क्षेत्रात पदवी घेतली.१९८५ मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी घेतली. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये विशेषत: बीना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. मोतीबिंदूंची गुंतागुंत असलेल्या २०६१ कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली आहे. बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर ‘डॉ .तात्या लहाने अंगार’ हा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांच्या जन्मापासून त्यांना पद्मश्री मिळेपर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे. याची निर्मिती आणि दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले आहे.

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..