नवीन लेखन...

प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा

सुप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा  यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ जम्मू येथे झाला.

शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई गायिका मा. उमा दत्त शर्मा यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे केले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते.

१९५६ साली शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला. १९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत “कॉल ऑफ द व्हॅली” ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली.

हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली “सिलसिला” चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने “शिव-हरी” या नावाने संगीत दिले होते. त्यांनी फासले, चाँदनी, लम्हे, डर या चित्रपटांना सुद्धा संगीत दिले.

त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे.

शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाची सुरूवात संथ आलापचारीने होते. ती ध्रुपद अंगाची असल्याने मुर्की, खटका वगैरे प्रकार वर्ज्य असतात. नंतर जोड अंगाचे वादन ते करतात. यात पूर्णपणे तालबद्ध नसले तरी लयीच्या अंगाने रागस्वरूप उलगडत जाणारे वादन असते. सांगता अत्यंत वेगवान लयीतल्या झाल्याने होते. त्यानंतर तबल्याच्या साथीने विलंबीत किंवा मध्य लयीतली गत आणि शेवटी द्रुतगतीतली गत असा वादनाचा क्रम असतो.

कारकीर्दीच्या सुरूवातीला मसीतखानी आणि रजाखानी अंगाने त्रितालातल्या गती वाजवणार्‍या शिवकुमार शर्मांनी पुढे रूपक, झपताल, एकताल यासारखे प्रचलित ताल तसेच मत्त ताल (९ मात्रा), रूद्र ताल (११ मात्रा), जय ताल (१३ मात्रा) आणि पंचम सवारी (१५ मात्रा) अशा तालांमधेही तितक्याच सहजतेने वादन केलेले दिसते. पिलू, पहाडीसारख्या रागांवर आधारलेल्या धुन तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या धुन वाजवण्यात कौशल्य मिळवलेले शिवकुमार शर्मां यांच्या तोडीचे वादक कलाकार मोजकेच असतील.

शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्यास नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. एखादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्यार लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते.

आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. पं. शिवकुमार शर्मांना पद्मविभूषणसह देशोदेशींचे सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत.

पं.शिवकुमार शर्मा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे `पं. शिवकुमार शर्मा द मॅन अँड हिज म्युझिक’ या अनोख्या कॉफी-टेबल बुक अनेक दुर्मीळ प्रकाशचित्रांनी हे पुस्तक सजले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..