ज्येष्ठ स्कॉटिश सिने अभिनेते व निर्माते सर शॉन कॉनरी यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० रोजी ब्रिटनमधील एडिनबरो शहरात झाला.
मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
शॉन कॉनेरी यांचे वडील रबर कारखान्यात रोज बारा बारा तास मजुरी करित असत. घरी आल्यावरही त्यांचे आपल्या आपल्या झोपडीत काहीना काही काम चालूच असे. शॉन थोडासा मोठा झाल्यावर आपल्या आईवडीलांना कामात मदत करू लागले. या शिवाय रोज पहाटे शहरात दूध घेऊन जात असत. १६ व्या वर्षी ते नौदलात भरती झाले.
शॉन कॉनेरी यांना पहिल्या जेम्स बाँड फिल्मसाठी पहिला १६,५०० डॉलर मिळाले होते तर शेवटच्या जेम्स बाँड फिल्मसाठी त्यांना आठ कोटी डॉलर मिळाले! शॉन कॉनेरी यांचे जेम्स बाँड वरचे सर्वच चित्रपट खूप गाजले.
शॉन कॉनेरी हे प्रत्येक चित्रपटात नवं घड्याळ व नवी कार वापरत असत. कॉनरी यांनी १९६२ ते १९७१ या दरम्यान डॉ. नो ~ १९६२, फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ~ १९६३, गोल्डफिंगर ~ १९६४, थंडरबॉल ~ १९६५, यू ओन्ली लिव्ह ट्वाईस ~ १९६७, डायमंडस आर फॉरेव्हर ~ १९७१ या बाँडपटांमध्ये नायकाची कामे केली. याशिवाय १९८३ मध्ये शॉन कॉनेरी अभिनित ‘नेव्हर से नेव्हर अगेन’ हा स्वतंत्र निर्मित एक बॉण्डपट झळकला होता.
शॉन कॉनेरीची गणना ‘ए’ ग्रेड आर्टिस्टमध्ये होत असे. शॉन कॉनेरीनं जेम्स बाँड ००७ या चित्रपट मालिकेतील सात चित्रपट केले. नंतर तो कंटाळला. तीन वर्षांपर्यंत त्यानं एकही भूमिका स्वीकारली नाही. निर्मात्यांनी त्याला खूप गळ घातली तरी त्याचं उत्तर एकच ‘सॉरी’. तो कधीही कोणत्याही वादात सापडला नाही. तीन वर्षांनंतर त्यानं कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून भूमिका केल्या. त्यानं एकूण ३० बोलपटांत काम केलं.
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर स्टीवन स्पीलबर्ग शॉन कॉनेरी विषयी गौरवोद्गार काढतांना म्हणतात, माझ्या दृष्टिकोनातून फक्त सातच अतिशय उत्तम दर्जाचे अभिनेते आहेत. त्यात शॉन कॉनेरीचा समावेश आहे. जागतिक पातळीवरचा गुप्तचर कसा असावा, हे त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्यानं दाखवून दिलं आहे.
अमेरिकेत त्याचं एक मोठं शांत वातावरणातलं फार्म हाऊस आहे. बहामा बेटावर त्याचा प्रशस्त बंगला आहे. २००० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांचा सर हा किताब देऊन सन्मान करण्यात आला होता. त्याच्या नायकांच्या भुमिकांसाठी कॉनरीला आजवर २ वेळा ऑस्कर तर ३ वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.
शॉन कॉनरी यांना सर्वोत्तम जिवंत स्कॉटिश व्यक्ती अशी उपाधी मिळाली होती.
सर शॉन कॉनरी यांचे ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
शॉन कॉनरी यांची वेबसाईट:
Leave a Reply