दिग्गज व्हाईस ओव्हर कलाकार हरीश भिमाणी यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९५६ रोजी झाला.
आजही हरीश भिमाणी हे भारतातील दिग्गज व्हाईस ओव्हर कलाकार मानले जातात. ८० च्या दशकातील लोकप्रिय टीवी मालिका ‘महाभारत’ सुरु होताना महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ‘महाभारत’चे टाइटल सॉंग व नंतर ‘मैं समय हूं’ हा आवाज हरीश भिमाणी यांचा होता. ‘मैं समय हूं’ हे इतके लोकप्रिय झाले होते मालिका सुरु होताना लहान मुले ही हे सुरात म्हणत असत.
हरीश भिमाणी यांना मराठी डॉक्यूमेंटरी फीचर फिल्म ‘मला लाज वाटत नाही’ या साठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता.
लता मंगेशकर यांच्यावर हरीश भिमाणी यांनी ‘लता दीदी अजीब दास्ताँ है ये’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. हरीश भिमाणी यांनी २००० हून अधिक रेकोर्डिंग केली आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply