विचा महिमा पाहू ,
अक्षर मोठे देखणे,
विलक्षण आहे जादू ,
त्याचेच “गारुड” पडणे,
विलोभनीय आहे सृष्टी, विचक्षण तिची शोभा,
विसंगत बघू रंग संगती, विलोभनीय की पसारा,–!!!
विशेष कितीतरी गोष्टी,
विवेचन त्यांचे किती करू,
विलक्षण विराजमानी,
आश्चर्यांना किती स्मरू,–!!!
विकार विवेक विचार, मनात असती भावना छुप्या, त्यातून विपरीत जन्म घेई,
नि भावनांची विविधता,–!!!
विनाशकाले विपरीत बुद्धि, विजोड बने हे सारे,
विदीर्ण आयुष्य होई,
विकल मानसिकता खरे,–!!!
विनिमय करत सकलांशी, विसंवादही टाळावा,
विनम्र राहून नियतीचा,
फक्त घाव उरी झेलावा,–!!!
विसरू नये चांगुलपणा,
विचारांती निर्णय घ्यावा,
विमुक्त जगण्यात अशा,
खरा विठ्ठलच बघावा,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply