व्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या, हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील.
मग पुढील प्रश्न का? हा विचारला तर उत्तर आहे का?
आज 2021 मध्ये कुणाचाच मनाचा तळ लागत नाही. हाहा म्हणता माणसाचा सैतान होऊन दुसऱ्याच्या जीवावर टपतो, तो संपावा म्हणून सतत जप करत असतो का तर ती रिकामी होणारी जागा भरण्यासाठी, तेव्हा तो नेहमी दुसऱ्याची कसपटे काढतो पण त्यावेळी तो स्वतःला विसरतो.
जर कुत्र्याला जर सतत सांगितले, हॅमर केले तर तू घोडा आहेस तर खिंकाळेल का?सतत तो जेव्हा भुंकेल आणि तो हलकट माणूस म्हणेल बघा तो कुत्रा खिंकाळत आहे?
गम्मत आहे ना या 20-21 मध्ये.
सो काहीही घडू शकते पण एक लक्षात ठेवावे मोर पिसारा जेव्हा फुकवतो समोरून सुंदर दिसतो पण तो पश्चिम दिशेकडून उघडा, नग्न दिसतो.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply