थोडे शिक्षण झाले की डोक्यात हवा जाते आणि विचार भरकटत जातात. आमच्या कडे मावशीबाई आहेत दहा वर्षे झाली आहेत त्या आमच्या कडे येतात. त्यामुळे आम्ही आपापल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करत असतो. गेल्या काही दिवसांत त्या एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. घरचे सगळेच. आणि तिथे गेल्यावर एकमेकांना बोलत असताना एका मुलीचे स्थळ आले होते. त्यामुळे मुलगी दाखवणे हा वेगळा कार्यक्रम न करता थेट चौकशी झाली. आणि सगळ्या समोर दोन्ही घरांची माहिती दिली गेली. आणि लगेचच मुलीकडची पाच सहा माणसं आली तीन बायका होत्या. मावशीबाई कडे घर वगैरे बघायला. जेवण खाण झाले. मावशीबाई आमच्या अति आनंदात. त्यामुळे जाताना सरबत केले वरुन तिघींना साड्या दिल्या…
दोन दिवसांनी फोन करून सांगितले की मुलगा कमी शिकलेला आहे. आणि मुलगी बी कॉम आहे म्हणून जमत नाही. हे सगळे त्या वेळी सांगितले होते. तरीही परत आलेच का होते? मान्य आहे परिस्थितीमुळे तो शिकला नाही पण लहान वयातच नोकरी करतोय आई वडिलांना सांभाळतोय. निर्व्यसनी निरोगी आणि मुख्य म्हणजे पुण्यात एक प्लॉट घेतला आहे पुढे तो नक्कीच घर बांधणार. सध्या ते एका सोसायटीत वन बीएचके मध्ये राहतात. आणि मुख्य म्हणजे एक चांगला माणूस म्हणून तो चांगलाच आहे. शिवाय मावशीबाई प्रामाणिक. कष्टाळू आहेत. सवतीवर लहानपणी लग्न झाले होते तेव्हा पासून सगळ्यांना धरुन आहेत म्हणून मुलावर चांगले संस्कार झाले आहेत. एवढ्या लहान वयात तो पैसा उडवत नाही. व्यसन नाही आणि हे दोघेही अजून कमावतात. त्यामुळे ती जरी शिकलेली आहे म्हणून लगेच नोकरी मिळेल का? आणि या लोकांनी तिला नोकरी करण्याची परवानगी दिली होती. आताच्या काळात हे गरजेचे आहे. आणि तिच्या विचाराप्रमाणे मुलगा शिक्षण घेऊनही चांगला असेलच याची खात्री आहे का? आणि तसेही पैसा कमावणे आताच्या काळात अनेक मार्ग सुकर आहेत….
दुसरा प्रकार परिस्थिती नाही म्हणून शिक्षणाचा विचार सोडुन एम पी एस परीक्षा द्यायची तयारी केली. फक्त तयारी परीक्षा द्यायची आहे अजून आणि एक चांगले स्थळ आले. असेच मुलगा सरकारी नोकरीत अधिकारी. घर गाडी वगैरे वगैरे पण डोक्यात हवा शिरली आणि मला आत्ताच लग्न करायचे नाही. लग्नाचे वय असताना…..पण शेवटी घरच्या लोकांनी समजावून सांगितले. आणि तयार झाली. मग आधीच इतका मानसिक त्रास दिला तो कशासाठी? शिक्षण. पैसा. रुप. इस्टेट. गाडी या आवश्यक आहेत की निर्व्यसनी निरोगी मन समजून घेणारा. सगळ्यांना बांधून ठेवणारा हे आवश्यक आहे याचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आणि तसेही अतिशय उच्च शिक्षित नवऱ्याची
बायको अशिक्षित किंवा कमी शिक्षण घेतलेल्या अनेक जणी आहेत पण त्यांचा संसार उत्तम झाला आहे याची अनेक उदाहरणे आहेत ती केवळ विचारसरणी या मुळेच आणि तसेही नवरा बायको पेक्षा कमी शिकलेला नसावा असा नियम आहे का?
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply