नवीन लेखन...

सामाजिक नेत्या, लेखीका, संपादक विद्या बाळ

विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे.

स्त्र‌ियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,’ असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात येण्यासाठी विद्या बाळ यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.

स्त्र‌ियांना त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांनी करून देणाऱ्या विद्या बाळ यांनी ‘स्त्र‌ी’ या मासिकात सुमारे २२ वर्षे म्हणजे १९८३पर्यंत काम केले. या काळातच १९८१ मध्ये त्यांनी स्त्र‌ियांच्या समस्यांचा वेध घेणाऱ्या ‘नारी समता मंचा’ची स्थापन केली. पुढे त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. स्त्र‌ियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आज स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या साऱ्याजणी ‘आपण बाया आहोत, हे नाकारत नाहीत. त्या जाणिवेत अडकून पडत नाहीत, त्याचा बाऊही करत नाहीत.

उलट त्या बाईपणाला ओलांडून व्यक्ती आणि माणूस म्हणून त्या स्वतःची ओळख करून घेऊ इच्छितात,’ अशी स्पष्ट भूमिका त्या मांडतात. याच मासिकाशी सलग्न ‘सखी मंडळा’ची स्थापनाही विद्या बाळ यांनी केली. स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक विषयांची चर्चा या मंडळामार्फत घडवून आणली जाते. ‘बोलते व्हा,’ ‘पुरुष संवाद केंद्र,’ ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय,’ ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,’ ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग,’ ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. या संस्थांकडे नजर टाकली, लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन अशी त्यांची चौफेर लेखणी आहे.

कृतीशील कार्यकर्त्या अशीही त्यांनी ओळख आहे. जनजागृतीसाठी रात्री काढलेली ‘प्रकाशफेरी,’ एकट्या स्त्र‌ियांसाठी परिषद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट्य, निदर्शने, परिसंवाद, ‘दोस्ती जिंदाबाद,’सारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून घेतले. अनेक कार्यकर्त्या तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्र‌ियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्या काम करतात.

त्यांना फाय फाउंडेशन, आगरकर पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव सन्मानसुद्धा मिळाला आहे. कथा गौरीची, अपराजितांचे नि:श्वास, शोध स्वतःचा, संवाद, तुमच्या-माझ्यासाठी, कमलाकी, तेजस्विनी, वाळवंटातील वाट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..