नवीन लेखन...

विद्या वाचस्पती अर्थात डॉक्टर शंकर अभ्यंकर

Vidya Vachaspati Dr. Shankar Abhyankar

एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे.

त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी प्रथम श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला ऐकली ती हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात.त्यानंतर मी त्यांची अनेक प्रवचने ऐकली. त्यांच्या आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकार झाले असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.

तुम्हाला जर घरी वाचन करायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या कार मध्ये श्री शंकर अभ्यंकर यांच्या सी डि , एम पी ३ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले व्याख्यान तुम्ही जर ऐकलेत तर मंत्रमुग्ध व्हाल .शिवरायांच्या आधीच्या अनेक पिढ्यांचा, सूर्यवंशी शिसोदिया राजपूत घराण्याचा इतिहास ऐकताना खूप आनंद होतो. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानात ऐकलेला इतिहास पुन्हा शंकर अभ्यंकर यांच्या तोंडून ऐकताना इतिहासातील अनेक बारकावे लक्षात येतात. तुमच्या कार मध्ये त्यांची “छत्रपती शिवाजी महाराज “हि एम पी ३ जरूर ठेवा.तुमचा लांबचा प्रवास अत्यंत सुखकारक करण्याची क्षमता या एम पी ३ मध्ये आहे.

कोल्हापूरला श्री महालक्ष्मी च्या दर्शनाला जाताना मी कार मध्ये त्यांचे श्रीसूक्ता वरील प्रवचन ऐकतो. श्री सूक्त ऐकले कि मनातील गोंधळ कमी होण्यास खूप मदत होते. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान न होणारे त्यांचे विचार प्रत्तेक तरुणानी ऐकले पाहिजेत .

संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास Analytical analysis करणारा आहे.समर्थ रामदास स्वामींवर बोलणारे श्री अभ्यंकर तुम्हाला त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्ते समोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

त्यांच्या प्रत्तेक भाषणात देशप्रेम तुम्ही अनुभवाल. भारत देशाबद्दल त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या “भारतीय संस्कृती” वरील भाषणात तुम्हाला अंतर्मुख करतील .त्यांनी लिहिलेल्या भक्ति कोश या ५ प्रचंड ग्रंथात तुम्हाला भारतीय आचार्य , भारतीय सांप्रदाय ,भारतीय संत , भारतीय तीर्थ क्षेत्रे व मंदिरे आणि भारतीय उपासना या संबंधात प्रचंड माहिती मिळेल. त्यांचा प्रत्तेक ग्रंथ शेकडो पानांचा आहे.सुदैवाने माझ्या संग्रहात हे पाचही खंड आहेत.

त्यांचे विचार ऐकल्यावर मला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले कि काय असे वाटत राहते. गेली ४ वर्षे मी त्यांचे विचार वाचतो आणि ऐकतो आहे. वयाचा विचार न करता ज्यांच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावे अशी त्यांची योग्यता आहे. या नव्या वर्षात माझ्या या पोस्ट मुळे एका व्यक्तीने जरी त्यांचे साहित्य अनुभवले तरी मला खूप आनंद होईल .

चिंतामणी कारखानीस –

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

7 Comments on विद्या वाचस्पती अर्थात डॉक्टर शंकर अभ्यंकर

  1. Avatar
    सौ वैशाली सदाशिव कुलकर्णी( सेवक सनातन संस्था)

    मी पण सरांची यु ट्युब वरची जवळ जवळ सर्व प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकली आहेत. त्या दैवी अनुभवाचे मी वर्णन करू शकत नाही. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम . आम्हाला असलेल्या अध्यामिक शंकाची उत्तरे गुरुदेव देतील का

  2. I have listened to him on TV programs.It is a treat to your ears.Amazing command over language and the topic. One feels really blessed.

  3. Dr. Shankar Abhyankar is the true speaker and very good human being. I have listened all the kind of his speech on youtube.

    Search in youtube below things.
    Dasbodh nirupan shankar abhyankar
    Sant dnyaneshwar Shankar abhyankar
    Swami Vivekanand Shankar abhyankar
    Sant Tumakaram Shankar abhyankar
    Shri Krishna Shankar abhyankar
    Bhagvad geeta shankar abhyankar

    you will get all the videos by shankar abhyankar.
    just find it in youtube and listem all of them. its amazing
    you will definitely learn something new..

  4. मीही अभ्यंकर यांचे प्रवचन ऐकले आहे …अगदी खिळवून टाकणारी मांडणी , ओघवती भाषा .
    ऋषितुल्य व्यक्तिमत्व ,
    त्यांना माझे शतशः प्रणाम

    • हे गुरू कधि झाले??? ह्यांच्या नावाआधी गुरुदेव शब्द येतो बऱ्याच वेळा म्हणून सहज एक शंका आली बाकी काही नाही

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..