नवीन लेखन...

व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग १

यस्तु संचरते देशान् यस्तु सेवेत पण्डितान् ।
तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि ॥

ज्या प्रकारे तेल पाण्यात पडले की ते पसरते त्याच प्रमाणे बाहेरील जग पहिल्या नंतर आपली बुद्धी सुद्धा वाढत जाते.

आज माझा पहिलाच प्रवासवर्णनाचा प्रयत्न! तर सुरुवात करतोय अश्या राष्ट्र पासून ज्याने फ्रान्सला धूळ चारली आणि अमेरिकेच्या तोंडचं पाणी पळवले… ते म्हणजे व्हिएतनाम.

व्हिएतनाम हे दक्षिण पूर्व आशिया खंडातील एक राष्ट्र. एकेकाळी चीन, कधी फ्रान्स तर कधी अमेरिका यांच्या अधिपत्याखाली असलेले राष्ट्र.. ह्यांच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात.

तर मागच्या दोन दशकापासून जगावर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या ह्या देशाला तुम्ही जर स्वतःहून भेट देणार असाल तर काय काय करावे याचे माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन आणि अश्या मी केलेल्या काही भ्रमंतीचे वर्णन येत्या काही भागात मी करणार आहे.

जायचे कसे:

भारतातील बऱ्याच ठिकाणाहून व्हायटमनला विमान प्रवास शक्य आहे. पण सध्या दिल्ली आणि कलकत्ता येथून सरळ विमानसेवा उपलब्ध आहे. मुंबईहून बँकॉक मार्गे जाणे सगळ्यात सोयीचे आहे. त्यात व्हिएतजेट, इंडिगो, मालिंडो ह्यांसारखे खिशाला परवडणारे पर्याय उपलब्ध असून कमी किमतीत तुम्हाला परतीचे तिकीट मिळू शकते. साधारण ४ ते ६ महिने आधी जर आपण बुकिंग केले तर अतिउत्तम.

तयारी काय करावी :

कोणत्याही परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट ची मुदत कमीतकमी ६ महिने असावी लागते जेणेकरून तुम्हाला परत येता येईल. तसे पहिले तर भारतीयांना व्हिसा ऑन अरायवल असलेल्या देशांपैकी एक असा व्हिएतनाम! पण त्या साठी आधी तुम्हाला व्हिएतनाम इम्मीग्रेशन मधून पत्र लागते. तुम्ही एखाद्या एजन्ट मार्फत करू शकता किंवा भारतातील व्हिएतनाम च्या एम्बस्सी मध्ये जाऊन चौकशी करून भरू शकता! व्हिसा चा खर्च २००० ते ४००० रुपयांदरम्यान येतो टुरिस्ट १ महिने ते ३ महिने अश्या प्रकारचा व्हिसा तुम्ही घेऊ शकता.

इथे जाताना पासपोर्ट साईझ फोटोग्राफ (सफेद बॅकग्राऊंड 4×6 सेमी) आणि आपले आणखी एखादे ओळखपत्र जरूर सोबत ठेवावे.

प्रवासात लागणारी औषधे सुद्धा जरूर असावीत.

व्हिएतनाम मध्ये उत्तर आणि दक्षिण भागात वातावरणात फरक जाणवतो दक्षिण भागात फक्त पावसाळा आणि उन्हाळा हे ऋतू असतात तर उत्तर भागात तुम्हाला थंडी पाऊस आणि ऊन हे ऋतू अनुभवयाला मिळतात.
गरम कपडे बरोबर असावेत.

भाषा आणि खाणे :

संपूर्ण व्हिएतनाम मध्ये भरपूर वैविध्य असून आपल्याला ते जाणवते. तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुमची नक्कीच चंगळ असेल. पण शाकाहारी माणसांनी घाबरून जायचे कारण नाही. कारण व्हिएतनाम मध्ये खूप ठिकाणी अनेक प्रकारचे फक्त शाकाहारी जेवण मिळते. आणि जवळपास सगळ्याच पर्यटन स्थळी आपल्याला निदान एक तरी भारतीय जेवणाचे हॉटेल मिळू शकते. इथली भाषा ही व्हिएतनामीस असून तिला आपण ऑस्ट्रोएशियाईक भाषा म्हणू शकतो तिच्यातील अक्षरे ही लॅटिन लिपीवर आधारित तर उच्चार हे चीनच्या भाषेतून घेतलेले आहेत. इथे अतिशय कमी प्रमाणात इंग्रजी बोलली जाते त्यामुळे तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात. पण तुम्ही भाषांतराचा प्रयोग करून आपल्याला हवे ते समभाषां करू शकता. किंवा इथे स्थानिक टूर गाईड सहज उपलब्ध होतात.

चला तर! तयार व्हा आपल्या नवीन सफरी साठी आपल्या तर्हेने आस्वाद घ्यायला ह्या बेधडक राष्ट्राची!

— यशोदीप भिरूड

(क्रमश:)

यशोदीप भिरुड
About यशोदीप भिरुड 3 Articles
मी यशोदीप भिरुड खान्देशी, पण जन्मापासून मुंबईकर झालोय. औषध निर्माणशास्त्र पदवी घेऊन मग आंतरराष्ट्रीय व्यवहार मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या व्हिएतनाम येते स्थायिक आहे. मला आवड तश्या बऱ्याच पण खाणे आणि फिरणे म्हणजे माझा आवडीचा विषय. नेहमी नवीन गोष्टी, नवीन मित्र आणि ठिकाणे ह्यांच्या शोधात असणारं व्यक्तीमत्व.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..