विजय अरोरा हे पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चे १९७१ सालचे अभिनयाचे गोल्ड मेडलीस्ट. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ रोजी गांधीधाम येथे झाला. बी.आर.इशारा यांनी आपल्या ‘जरूरत’ या चित्रपटा द्वारे विजय अरोरा यांना पहिला ब्रेक दिला. त्याच वर्षी आशा पारेख यांच्या बरोबर ‘राखी और हथकड़ी’ मध्ये काम केले, पण विजय अरोरा यांना लोकप्रियता १९७३ साली आलेल्या ‘यादों की बारात’ चित्रपटाने मिळाली. त्यांनी ‘रामायण’ टीव्ही सिरीयल मध्ये ‘मेघनाद इंद्रजीत’ ची भूमिका केली होती. विजय अरोरा यांनी ‘भारत एक खोज’ मध्ये ‘बादशाह जहांगीर’ ची भूमिका केली होती. माधुरी दीक्षितच्या बरोबर त्यांनी गुजराती चित्रपट ‘राजा हरीशचंद्र’ मध्ये काम केले होते. त्यांनी काही गुजराती नाटकात पण काम केले होते. त्यांचे इतर चित्रपट ’36 घंटे’, ‘कादम्बरी’, ‘इंसाफ, रोटी’, ‘जीवन ज्योति’, बड़े दिलवाला, ‘जान तेरे नाम’, ‘इंडियन बाबू’. विजय अरोरा मॉडल व मिस इंडिया दिलबर देबारा यांच्या बरोबर लग्न केले होते. ११० सिनेमे आणि ५०० हून अधिक भाग टीव्ही सिरीयल मध्ये अभिनेता म्हणून यशस्वीरित्या केल्यानंतर विजय अरोरा यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु करत अनेक जाहिराती तयार केल्या. या क्षेत्रातील भारतातील पहिली आय एस ओ ९००० कंपनी असण्याचा मान याच्या कंपनीने मिळवला होता. त्याने जेम एन्ड ज्वेलरी कौन्सिल इंडिया या संस्थेचे असंख्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन तर केलेच पण त्या सोबत असंख्य कंपन्याची प्लेईंग कार्ड्स बनवत ती अमेरिकेतील वार्नर ब्रदर्स कंपनीच्या सुपर मॅन चित्रपटासाठी उपलब्ध करून दिली . विजय अरोरा यांचे २ फेब्रुवारी २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply