ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता, भाजपाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९१९ रोजी मध्यप्रदेशातील सागर येथे झाला.
माहेरच्या त्या लेखा महेंद्र सिंग ठाकूर. त्या उच्चशिक्षित होत्या. विजयाराजे यांचे लग्न १९४१ मध्ये ग्वाल्हेरचे महाराजा जीवाजीराव शिंदे यांच्यासोबत झाले होते. विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या.
१९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला.भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९६७ मध्ये मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्या अखेर पर्यंत जनसंघ जनता पक्ष व भारतीय जनता पक्षात राहिल्या.
अटलबिहारीना त्या मुलगा मानीत. त्यांना पाच मुले झाली. त्यांची मोठी मुलगी पद्मावती राजे शिंदे हिचे लग्न त्रिपूराचे महाराजा किरीट देब बर्मन यांच्यासोबत झाले. १९६४ मध्ये पद्मावती राजे यांचे निधन झाले. दुसरी मुलगी उषाराजे हिचे लग्न नेपाळच्या राजघराण्यात पशुपती शमशेर जंग बहादुर राणा यांच्यासोबत झाले होते.ती राजकारणापासून दूर राहिली. मुलगा माधवराव शिंदे कॉंग्रेस मध्ये व त्या मात्र विरोधात असे चित्र अखेर पर्यंत राहिले. माधवराव शिंदे यांनी राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषविली. २००१ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.त्यांची एक मुलगी वसुंधरा राजे शिंदे राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. सर्वात लहान मुलगी यशोधराराजे शिंदे मध्य प्रदेशच्या उद्योगमंत्री राहिल्या आहेत.
विजयाराजे शिंदे यांच्या जीवनावर अधारीत ‘एक थी राणी ऐसी भी’ हा चित्रपट एप्रिल २०१७ मध्ये देशभरात प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी विजयाराजे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विनोद खन्ना, सचिन खेडेकर, राजेश शृंगारपुरे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
विजयाराजे शिंदे यांचे २५ जानेवारी २००१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply