पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटत असतात. विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे. परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी २०१७ मधील विजयदुर्ग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
२९,३० व ३१ डिसेंबर २०१७ रोजी विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विजयदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे… या महोत्सवला अवश्य भेट दया..
देवगड तालुक्याला आध्यात्मिक, साहित्यीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वारसा आहे. याचे येथे पदोपदी प्रत्यंतर येते. या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळच आहे. येथील अनेक स्थळे अजूनही प्रसिध्दीपासून दूर आहेत. मात्र त्यांचे सौंदर्य, वैशिष्टये इतकी आगळी-वेगळी आहेत की, एकदा आलेला पर्यटक पुन्हा-पुन्हा येण्याचा निश्चय करूनच परतात.
या महोत्सवला येण्याऱ्या पर्यटकांना विजयदुर्ग व आजुबाजूच्या पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती.
विजयदुर्ग बंदर
विजयदुर्ग हे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या आणि मराठयाच्या काध्हात या बंदरात फार मोठी वर्दळ होती. सुरक्षित आणि खोल वाघोटन खाडीमुळे गिर्ये गोदी आणि वाघोटण गोदी यांचा मालवाहतुकीचा उपयोग करून घेतला जात होता. पूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी देवगड प्रमाणेच विजयदुर्ग बंदरातही जाता येता थांबत असे. परंतु मागील २०, २५ वर्षापासून या बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची इतर साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या मानाने मालवाहतूक बरीच कमी झाली आहे. सध्या या बंदरातून कोल्हापूर भागातील साखर कारखान्यातील लाखो टन ऊसाची मळी निर्यात होत आहे. शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज प्र.लि. या कंपनीशी करार केला आहे. या बंदरासाठी हजारो कोटी हजारांची गुंतवणूक होणार असून हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो हाताळला जाणार आहे.
गिर्ये गोदी
विजयदुर्ग-तळेरे मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून 27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या वाडातर, मुंबरी खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती. साधारणपणे मराठ्यांची जहाजे २० ते १५० टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता ५०० टनी जहाजांची होती. सुमारे १०६ मी. लांब आणि ७० मी. रूंदीची ही गोदी उत्तराभिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार, संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.
ब्रिटीशकालीन (मराठ्यांचा) बंगला, वाघोटन
तळेरे विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर वाघोटन गाव आहे. विजयदुर्ग-वाघोटन खाडी, वाघोटन गोदी, हिरव्यागार वनराईरने सजलेल्या आंब्यांच्या बाबा, कोकणातील सर्वात मोठया आणि दणकट चि-यांचा खाण व्यवसास या बरोबरच या गावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे येथील ब्रिटीश कालीन (मराठ्यांचा बंगला) होय.
सुमारे १६५ वर्षापूर्वी बांधलेल्या आणि स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बंगल्याची निर्मिती ब्रिटीशांनी अटक केलेल्या थिबा राजाला सन्मानाने ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी केले होती. एकूण १३ गोल आणि चौकोनी आकाराचे अजस्र खांब, भव्य कमान्या यातून साकारलेल्या या बंगल्याला उत्कृष्ट सागवानी लाकूड वापरेलेले आहे. ब्रिटीशकालीन आठ हापूस आंब्यांची झाडे अद्यापही आहेत. येथे त्याकाळीतील विहीर, पडझड झालेला कैदखाना, घोडयांच्या पागा आहेत. हा ऐतिहासिक बंगला १९३२ साली होमोओपॅथिक डॉ. माधव कृष्णा मराठे यांनी लिलावात घेतला. या बंगल्यात आजही त्यांच्या औषधे बनविण्याच्या आणि साठवणीच्या वस्तू तसेच औषधोपचार व धार्मिक पुस्तकांचा संग्रह देखरेख करणा-यांनी सांभाळला आहे. याच बागेत माधव मराठे, कमलाबाई मराठे, अक्का मराठे, कृष्णा मराठे यांच्या समाधी आहेत.
वाघोटन गोदी
देवगड पासून सुमारे २९ कि.मी. अंतरावर तळेरे-विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर ब्रिटिश कालीन सुप्रसिध्द वाघोटन गोदी आहे. गिर्ये गोदी प्रमाणे येथील रचना असून ही गोदी ब्रिटीश काळात फार उपयुक्त होती. ब्रिटिशनौदलाच्या यशस्वीतेत वाघोटन गोदीने भर घातली आहे. ही कोकणच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. डोंगरमाथ्यावरून वाघोटन गोदी, वाघोटन खाडी, हिरवेगार डोंगर पहाण्यासारखे आहेत.
मणचे धबधबा
देवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.
विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून २० कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून ५ कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून ३५ कि.मी. अंतर आहे. हा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे ३०० फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे. या धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.
Utkrushta paryatan mahiti par lekh. Sarvasamanyana ashi anabhidnya sthale dnyat karun dili tar paryatakansathi ani sthayi lokansathi phaydeshir tharel. 2017 nantar kahi events zale nahit ka. Tasech ha wada yaghadila vapartat ahe ka.
Ratnagiri chya Thiba palace shi yacha kahi sambandh ahe ka.