इंग्लंडमधील अॅस्टन जिल्ह्यातील बर्मिंगहॅम येथील हे प्रसिद्ध फुटबॉल मैदान आहे. १८९७ पासून ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लबचे ते होम ग्राउंड आहे. १६ इंटरनॅशनल सामन्यांचे यजमानपद व्हिला पार्कने यशस्वी केले. १८९९ मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. इंग्लंडमधील हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल मैदान आहे.
या मैदानावर चार स्टॅण्ड विद्यमान असून नवीन नॉर्थस्टॅण्ड उभारण्याची योजना आहे. हा नवीन स्टॅण्ड पूर्ण झाल्यावर या स्टेडियमची आसन क्षमता ४२,६४० वरून ५० हजार इतकी होईल. अत्यंत भव्य आणि अद्वितीय असे हे मैदान आहे. १८९७ मध्ये जेंव्हा हे स्टेडियम बांधण्यात आले तेंव्हा १६४० पौंड खर्च झाला होता. हे मैदान पूर्वी ‘व्हिक्टोरीयन ॲम्यूझमेंट पार्क’ म्हणून ओळखले जात होते. जेथे एक छोटेसे माशांचे तळेही होते. जे मालकाच्या ताब्यात होते. या मैदानात सर थॉमस हॉटेलचाही समावेश होता. जेव्हा हे मैदान बांधण्यात आले तेव्हा या मैदानावर सुमारे ४०,००० लोक बसण्याची क्षमता होती. जास्त प्रेक्षकांना बसण्यासाठी खुले मैदानच होते.
या मैदानावर सर्वप्रथम एक मैत्री सामना १७ एप्रिल १८९७ साली खेळविण्यात आला. १९११ मध्ये नवीन जमीन ८२,२५० पौंडला विकत घेण्यात आली व १५०० पौंडात कार्यालयाची इमारत आणि पार्कींग बांधण्यात आले. या खरेदीमध्ये ‘व्हिला’ चे संचालक फेडरिक रिंडर यांचा पुढाकार होता. त्यांची इच्छा होती की, या मैदानाची आसन क्षमता ही १,२०,००० इतकी असावी.
परंतु या सगळ्या योजनांचा आवाका कमी करण्यात आला. त्याचे कारण म्हणजे पहिले महायुद्ध. १९१४ साली झालेल्या कामांमध्ये येथील ‘रनिंग ट्रॅक’ काढून टाकण्यात आला. अखेरीस १९२२ साली हे काम संपल्यानंतर बऱ्याच समालोचकांनी या कामाला आर्किटेक्ट आर्चि लेच यांचे उत्कृष्ट काम म्हणून संबोधले.
१९५८ साली या मैदानावर प्रकाशझोतांची सोय करण्यात आली व ४०,००० पौंड खर्च करून तेथील ‘द हॉटेल एन्ड’ला छत बांधण्यात आले. व्हिला पार्क येथे विविध खेळांचे सामने होऊन त्याबद्दल अनेक चषकांसाठी येथे स्पर्धांचे आयोजन केले जाते. फुटबॉलच्या सामन्यांसाठी या मैदानाचा जास्त वापर करण्यात आला असून या मैदानावर ५५ उपान्त्य सामने खेळविण्यात आले आहेत. अॅथलॅटिक्सचे आणि सायकल स्पर्धांचे सामने पहिल्या महायुद्धापूर्वी आयोजित केले जात असत. स्पर्धांचे सामने पहिल्या महायुद्धापूर्वी आयोजित केले जात असत.
Leave a Reply