अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.
मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या कविता मी त्या त्या कवीच्या शक्य तितक्या वैशिष्ठ्यांसह, त्या त्यांच्याच आहेत असे वाटावे अशा पद्धतीने रचल्या आहेत. या सर्व अत्यंत थोर कवींची क्षमा मागून हा प्रयत्न आपल्यापुढे मांडतो आहे.आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.
कविवर्य विंदा करंदीकर हे डाव्या विचारसरणीचे ! अभिजात सौंदर्य न्याहाळतांनासुद्धा त्यांच्या नजरेतून शोषण सुटत नसे. सुंदर काही पाहतांना त्यांना करुणेचा पदरही दिसत असे. आज ते हयात असते तर सगळीकडे वाढलेल्या शोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पाऊस कसा वाटला असता ? .. हे त्यांच्याच शैलीत…
” एक पाऊस वेदाचा, एक पाऊस स्वेदाचा “…
Leave a Reply