साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी ‘नरसी भगत’ आणि ‘शारदा’ मध्ये अभिनय केला आहे. किशोरवयात ‘अंगुलीमाल’ मध्येही काम केले आहे. विनोद मेहरा यांचा प्रथम चित्रपट १९७१ साली रीटा हा होता, सोबत होती तनुजा ते १९७१ मध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी याचा बरोबर ‘लाल पत्थर’ मध्ये युवा नायकाच्या रूपात सादर झाले. विनोद मेहरा यांच्या फिल्म करियर ला मौसमी चटर्जी ने हात दिला, शक्ती सामंत यांची फिल्म अनुराग (१९७२) मध्ये मौसमी-विनोद प्रथम एकत्र आले. मौसमी चटर्जी यांनी एक दृष्टिहीन युवती चा रोल अतिशय उत्तम केला होता. विनोद मेहरा यांनी एक आदर्शवादी नायकाची भूमिका केली होती. नायकाला आपल्या पित्याच्या इच्छे विरुद्ध मौसमी बरोबर लग्न करावयाचे असते.
या नंतर त्यांनी उस पार (बसु चटर्जी), दो झूठ स्वर्ग नरक या चित्रपटात मौसमी बरोबर नायक म्हणून काम केले. तो काळ मल्टीस्टार फिल्म चा होता. विनोद खन्ना, राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेन्द्र, जीतेन्द्र, अमिताभ असताना विनोद मेहरा यांना जादा सिनेमे मिळाले नाहीत. त्यांनी दक्षिण भारतीय फिल्म डायरेक्टर्स कृष्णन् पंजू , आर.कृष्णमूर्ति, एस. रामानाथन् तथा दसारी नारायण राव बरोबर काम केले. विनोद मेहरा व रेखा याची जवळीक व रोमांस याची चर्चा बॉलीवुड खूप दिवस चालू होती. त्यांनी लग्न केल्याची चर्चा होती. खर खोटे काय ते विनोद व रेखा यांनाच माहीत…. तसे यांनी विनोद मेहरा तीन लग्ने केली होती. मीना ब्रोका पहली पत्नी, बिंदिया गोस्वामी दुसरी, तिसरी किरण. विनोद मेहरा यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विनोद मेहरा यांचे काही चित्रपट
लाल पत्थर (१९७२), अनुराग (१९७२), सबसे बड़ा रुपैया (१९७६), नागिन (१९७६), अनुरोध (१९७७), साजन बिना सुहागन (१९७८), घर (१९७८), दादा (१९७९), कर्तव्य (१९७९), अमर दीप (१९७९), जानी दुश्र्मन (१९७९), बिन फेरे हम तेरे (१९७९), द बर्निंग ट्रेन (१९८०), टक्कर (१९८०), ज्योति बने ज्वाला (१९८०), प्यारा दुश्र्मन (१९८०), ज्वालामुखी (१९८०), साजन की सहेली (१९८१), बेमिसाल (१९८२), स्वीकार किया मैंने (१९८३) लॉकेट (१९८६) प्यार की जीत (१९८७)
Leave a Reply