आजकालच्या Chatting च्या भाषेनुसार मराठी “विरळ “शब्द Viral असा लिहितात पण त्याचा इंग्लिश मधला खराखुरा उच्चार..”व्हायरल”. Spelling मध्ये साधर्म्य असलं तरी दोन्हीच्या अर्थात मात्र खुपंच अंतर आहे… प्रत्येक गोष्ट “Viralव्हायरल” करता करता अनेक गोष्टी एकतर “Viralविरळ” व्हायला लागल्या आहेत किंवा वाईट गोष्टी “Viralव्हायरल” झाल्यामुळे त्यातल्या चांगल्या गोष्टी झाकोळल्या जाऊन “Viralविरळ” झाल्यासारख्या वाटतात.
सध्याच्या या युगात…
“सत्य” झालंय (Viral) विरळ……. पण “अफवा” होतात Viral व्हायरल
दिवसेंदिवस पाहावं तर… “आनंद ” होतोय विरळ……. पण “दुखः” होतंय Viral..
थोर व्यक्तींच्या जीवनकार्याचा… “अभ्यास ” होतोय विरळ……. पण त्यांच्या नावे “quotes” होतात Viral
वेगवेगळ्या आजारांचं…. “निदान ” होतंय विरळ……. पण “उपाय” होतात Viral
माणसामाणसात एकमेकांविषयी.. “विनम्रता ” होतेय विरळ……. पण “अनावर क्रोध ” होतो Viral
आजी-आजोबा,आई-वडिलांबरोबर रहाणं-भेटणं होतंय विरळ……. पण त्यांचे “DAYS” होतात Viral
TV, नाटक- सिनेमातला.. “विनोद ” होतोय विरळ……. पण “खोटं हास्य” होतं Viral
काही तासांच्या उत्तम कलाकृती मधला… “आशय ” होतोय विरळ……. पण काही सेकंदांची “ती clip” होते Viral
Reality Show मधली “Reality” होतेय विरळ……. पण नुसता “Show” होतो Viral.
संगीत मैफिल असो वा जाहीर सभा.. “दर्दी ” होतायत विरळ……. पण “गर्दी” मात्र Viral
सर्वच स्तरातल्या शिक्षणातला… “दर्जा ” होतोय विरळ……. पण “सावळा गोंधळ” होतो Viral.
डॉक्टर, शिक्षक, व्यापारी संघटनांच्या “मुख्य मागण्या” होतात विरळ……. पण “मोर्चे – संप” होतात Viral.
रूढी – परंपरा, सण – उत्सवांमधला “मूळ उद्देश ” होतोय विरळ……. पण त्याचे “Event” होतात Viral
दसरा -दिवाळी किंवा वाढदिवसानिमित्त… “भेटीगाठी” होतायत विरळ……. पण भरघोस “शुभेच्छा” मात्र Viral.
स्त्री – पुरुष नात्यातलं.. “निखळ प्रेम” होतंय विरळ……. पण “विकृती” होतेय Viral
आजच्या घडीला माणसामाणसातला “संवाद ” होतोय विरळ……. पण “वाद” होतात Viral.
कुठल्याही क्षेत्रातल्या नाण्याच्या दोन बाजूत “चांगली” नेहमीच राहते विरळ……. आणि “वाईट” लगेच होते Viral
एव्हढंच काय तर…. डेंग्यू, मलेरियाच्या महागड्या टेस्ट करून… “खिशातल्या नोटा ” होतात विरळ……. आणि शेवटी तापही निघतो Viral
विनोदाचा भाग जाऊ दे पण वास्तव हेच आहे की… सगळं काही “Viral” करण्याचं….. infection न झालेली माणसं मात्र “विरळ” सगळं काही “Viral” करण्याचं….. infection न झालेली माणसं मात्र “विरळ”
म्हणूनच सगळे मिळून आता ठरवू… सभोवतालची “नकारात्मकता” करूया विरळ……. आणि फक्त “सकारात्मकताच” करूया Viral
“नकारात्मकता” करूया “विरळ”… “सकारात्मकताच” करूया “Viral”
© क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply