मला जुनी हिंदी गाणी आवडतात.अगदी सिनेमा भारतात आला तेव्हापासून आत्तापर्यंत!अर्थात आत्ताची काही निवडक गाणी आवडतात. सत्तरच्या दशकापर्यंत आणि आत्ता यांच्या तुलनेत अगोदरची गाणी जास्त आवडतात. गाणी आवडतात म्हटलं की त्याचे गायक, गायिका,संगीतकार, गीतकार, त्यात अभिनय करणारे कलाकार हे ही आवडतातच की!!
पण असं होत नाही,कधी कधी यात प्रचंड विरोधाभास असतो.म्हणजे असं बघा, लतादीदी या आवडत्या गायिका आहेत पण आपल्याला अतिशय आवडणारं गाणं मात्र त्यांनी गायलेलं नसतं.
माझ्या बाबतीतही असंच झालंय. माझ्या आवडत्या गाण्यांच्या यादीत एक नंबरवर असण्याऱ्या गाण्याचे गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता, अभिनेत्री एव्हढंच काय तो चित्रपटही माझ्या आवडीचा नाही.पण ते गीत मात्र अतिशय आवडतं.
सांगते, बघू ओळखता येतंय का तुम्हांला? माझे आवडते हिंदीतले गायक, गायिका आहेत मुकेश आणि लतादीदी. पण हे गाणं गायलंय महंमद रफी आणि आशा भोसले यांनी. माझे आवडते हिंदी संगीतकार आहेत नौशादजी. पण या गाण्याचे संगीतकार आहेत जयदेव. माझे आवडते हिंदी गीतकार आहेत शैलेंद्र आणि गुलजार. पण हे गाणं लिहिलंय साहिर लुधीयानवी यांनी.
माझा आवडता अभिनेता आहे राज कपूर पण या गाण्यात अभिनय केलाय देव आनंद यांनी. माझी आवडती अभिनेत्री आहे आधी मधुबाला नंतर नूतन. पण या गाण्यात अभिनय केला आहे साधना हिने. आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल माझं आवडतं गाणं!! पण तरी सांगते, माझा आवडता चित्रपट आहे गाईड आणि हे गाणे आहे……….
हम दोनो या चित्रपटातील!!! हो,कुणी कुणी ओळखलं?? सांगाल का?? अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं || हे ते मधुर गाणं!!
तुमच्याही आवडत्या गाण्याच्या बाबतीत असं झालंय का??
माधुरी आठल्ये
Leave a Reply