जग हे आता इतकं फास्ट झालंय की मागचा काळ आठवायला आता कोणाला वेळ पण उरला नाहीये ,आता सकाळ एक धावपळीने होते आणि सर्व दिवस एका धावपळीत च सम्पून जातो,आज लोक कामात इतके मग्न झालेत की माणसाला आता जुन्या आठवणी जुन्या झालेल्या वाटतात काय उरलाय त्यात ,कदाचित आता नुसतं धावपळीत जगायचं ,रात्र कशी सरून जाते आता आपल्याला सकाळी उठल्यावर समजत आमचे आजोबा सांगत असत आमच्या जुन्या काळात माणस शेतीतून राबून दमून थकून यायची पण जुन्या आठवणी काढल्या शिवाय राहत नसत…
आज काळ बदलला य प्रचंड शहरी करण शेतीचा होत चाललेला रास शेतीत प्रचंड प्रमाणात वापरत असलेलं कीटक नाशक रासायनिक खते यांनी माणसाचं सगळं आयुष्यच बदलून टाकलंय आमचे आजोबा सांगतात आम्ही कधी कीटक नाशक मारेल नाही त्या काळात पण पिके खूप छान येत असत कोणत्या हो रोगा शिवाय आज काल तर पिकांना रासायनिक खते आणि कीटक नाशके वापरल्या शिवाय पीक येऊच शकत नाही
आज सिमेंट च्या जगलात माणूस नुसता कोडातलाय त्याला रात्र न दिवस फक्त आणि फक्त पैसा एके पैसा च दिसतो बारा बारा तास काम करून येऊन साधी झोप पण नीट घेईना झालाय आजच माणूस.
— दिपक जाधव
Very nice