विशाल आपुले पंख फैलावुनी,
उंच उंच आभाळी उडावे,
मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत –विहरत गात जावे,–||१||
नको कुठले ताणतणाव,
नकोच कुठल्या चिंता,
भोवती निळा आसमंत,
मेघ सारे नि विद्युल्लता,–||२||
वाटले तर वृक्षांवर बसुनी,
निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत,
नको कोणाचीच मनधरणी,–||३||
अपमान, मानभंग, दुःखे,
कोणीच नको करायाला,–
नातीगोती टोचती सारी,
अवघ्या मानवजातीला,–||४||
आपल्या दिलाचा मीच राजा, काळवेळ कसले बंधन नसे, एकमेकात लढून सारखे ,
गुंता वाढवणेही नसे,–||५||
निळ्या आभाळात बागडत, मुक्तपणे वर वर जावे,
पैसा सत्ता प्रतिष्ठा सोडुनी,
पक्षीजगातील आनंद लुटावे,–||६||
गोड फळे झाडांवरची,
तृप्त होत खात राहावे,
माणसांना चिडवत चिडवत, फांदीवरती उंच बसावे,–||७||
हिरव्या हिरव्या धरेवरी,
स्वैर सगळे सुख लुटावे,
धुंदीतच राहून आपल्या शेवटी इथेच आपुले प्राण सोडावे,–||८||
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply