विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला
अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला….१,
संतापूनी मजवर , कान उघडणी केली
तुझ्याचमुळें मुर्खा मी, अमंगळ ती ठरली, २
आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त
कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ३
परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास
रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply