नवीन लेखन...

चित्रकार विश्वनाथ नागेशकर

गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार.त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१० रोजी झाला.विश्वनाथ नागेशकर, हे कोल्हापूरचे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसत असे. विश्वनाथ नागेशकर यांचे फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण गेले. त्यांनी कोल्हापूरचे कलाप्रेमी छत्रपती मा.शाहू महाराजांच्या मदतीने मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. तेथे डिप्लोमा घेतल्यानंतर १९३५ साली उच्चशिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. पॅरिसच्या एकोल नॅशनल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जर्मनीतील म्युनिच आर्ट स्कूलमध्ये २ वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करताना सन्माननीय अलेक्झांडर वॉन, हॅम्बोल्टची स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर बर्लिन अकादमीच्या भव्य आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सतत कलासाधनेत मग्न असा भारतीय हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळख. प्रो. स्टुब यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. जर्मन कलाजगतात चांगली ओळख निर्माण झाली. प्रो. स्टुब आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्यांची चित्रे पाठवत. म्यूरल्स हा खास आवडीचा विषय त्यामुळे युरोपात बदलत गेलेल्या शिल्पकलेचाही अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात स्वतःचे घर, स्टुडिओ, पेटिंग्ज बेचिराख होताना पाहिले. नाझींच्या त्रासातून लंडनला जावे लागले. एडना नावाच्या जर्मनीशी त्यांनी विवाह केला. एकना यांनी मा.विश्वनाथ नागेशकर यांना आणि त्यांच्या चित्रकलेला आयुष्यभर जपले. या दोघांच्या जीवनप्रवासाची, कलाप्रवासाची ही कहाणी आहे. आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने निर्माण केलेल्या चित्रकृतींमुळे नागेशकरांनी परदेशात अभूतपूर्व यश व किर्ती मिळवली. भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार. लंडनचा निरोप घेतल्यावर संपूर्ण युरोपचा प्रवास, म्युझियम, कलादालन पटात राहिले. १९५५ नंतर पुन्हा जर्मनीला स्थायिक. एडना व त्यानंतर विश्वनाथ नागेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व उपलब्ध चित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू कोल्हापूरला मा.जयसिंग नागेशकर यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पुढाकार घेवून या पुस्तकाची लेखनाची जबाबदारी माधवीताई देसाई व प्रकाशनाची जबाबदारी मुक्ता पब्लिशिंग हाऊसवर सोपविली. तसेच मुंबई, पुणे, गोवा, सांगली येथे चित्र प्रदर्शने भरविली. अशा प्रकारे देशी व परदेशी चित्रकलेतील विविध प्रकारांचे ज्ञान आत्मसात करुन आपल्या कलेच्या सामर्थ्यावर तेथेच स्थायिक झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमाहूनही त्याचा परिणाम आपल्या चित्रकृतींवर न होवू देता आपल्या असंख्य कलाकृतींनी जागतिक कीर्ती संपादन केली. मा.विश्वनाथ नागेशकर यांचे १८ मार्च २००१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

आपल्या मातृभूमीशी परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर विश्वरंग नावाचे पुस्तक आहे. पुस्तकात त्यांची १६ रंगीत चित्रे दिली आहेत.
http://www.discountpandit.com/products/Rohtak/books/Vishwarang-Paperback-Marathi-price-in-
india-NzUxNzI=.html

विश्वनाथ नागेशकर यांची वेबसाईट.
http://www.nageshkarart.com/

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..