विसोबा खेचर संत नामदेवांचे गुरू होते.
संत विसोबा खेचर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे नाईक किंवा सराफ. ते पांचाळ सोनार समाजातील होते.
त्यांचे मूळ नाव विश्वनाथ महामुनी असे होते.
मुंगी गाव सोडून ते अलंकापुर (आळंदी) येथे चाटीचा (कपडे विकण्याचा) व्यवसाय करू लागले.
देह आकाशगमन करण्याइतका हलका, तरल करण्याची सिद्धी प्राप्त असलेला योगी म्हणजे खेचर. खेचरी विद्या प्राप्त असल्याने विसोबांना खेचर हे आडनाव मिळाले.
— आकाश विहारकर
Leave a Reply