चंद्रभागेतीरी भक्तीचा मळा,
झाले वारकरी गोळा,
आंसुसले सारे विठ्ठल दर्शना,
एवढीच ना मनोकामना,
विठूमाऊली,
घरदार सोडून इथवर येता पावसापाण्यां न जुमानता,
तुम्हा कारणे देह झिजवतां,
पतितपावन झालो आता,
रखुमाई,–!!!
तुम्ही आमुचे आई- बाप,
जगाचेच आहात साऱ्या,
विनंती एवढी विठुराया,
लेकरांवर करी कृपा,
झडकरी,–!!!
घेऊन आलो भक्ती,
दुःख, आणखी व्यथा,
अडकलो संसारा
जाणा हो,पंढरीनाथा,
लवकरी,–!!!
नको आम्हा काही,
शेती पैसा-अडका,
लौकिक विचार थोडका ;
फक्त द्या चरणांशी जागा,
इहलोकी–!!!
रहावे दृष्टिपथात तुमच्या,
एवढीच आमुची विजिगिषा,
तळमळे जीव आमुचा,
तुमच्याच हो दर्शना,–
विठूमाऊली–!!!
पातलो, मातलो,कंटाळलो,
विटलो इतुके संसारा,
वेध आता आम्हा लागे,
मुक्तीचा म्हणा खरा,
जीवनांती,-!!!
निवृत्ती आम्ही घेतली,
तरसलो विशेष ज्ञाना,
चढवा तुम्ही आम्हा,
सोपानी, मुक्तीच्या
श्रीहरी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply