ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल
कायम मनीं वसावा विठ्ठल ।।
नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा
मजला केवळ ठावा विठ्ठल ।।
जगतीं ऊन नि खड्डे काटे
वाटेवरी विसावा विठ्ठल ।।
अंध पुरा मी, मार्ग दिसेना
तडफड ही – कवळावा विठ्ठल ।।
थांबायाचें जेव्हां हृदया
तेव्हां मुखीं असावा विठ्ठल ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply