राहुनीया माणसांच्यातही साऱ्या
आज मनास वाटते! रहावे एकटे
एकांत! जरी असे भेडसावणारा
तरी नीरवतेत, शांती जीवा लाभते ।।१।।
आजकाल, सारेच रहाती व्यस्त
नां कुणासाठीही इथे वेळ कुणाला
आत्मकेंद्रित! व्यापार भावनांचा
होवूनी आत्ममग्न, वाटे रहावे एकटे ।।२।।
आजची हीच वास्तवी जगरहाटी
भावनांचीच इथे नित्य पायमल्ली
धडपड प्रत्येकाचीच जगण्यासाठी
प्रेम आस्था, जिव्हाळा भासे वोखटे ।।३।।
संवाद, शुष्क कोरडे सारे बेगडी
आर्तता, ओलावा सारीच रुक्षता
राहुनीया माणसांच्यातही साऱ्या
आज मनास वाटते! रहावे एकटे ।।४।।
© वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०७.
१२ – ८ – २०२१.
Leave a Reply