प्रेम म्हणजे नसतं ,
नुसतं उमळून येणं ,
किंवा नसतं एकमेकात ,
सतत विरघळून जाणं.
प्रेम म्हणजे प्रणयाचा –
नसतो फक्त आवेग ,
प्रेमात नसते कुठेही –
आखायची भोज्जाची रेघ.
प्रेम म्हणजे असतं ,
समजून घेणं दुसऱ्याला ,
तोंड मिटून शिकायचं ,
मनापासून ऐकायला.
प्रेमाला पुरतो दोघांचा ,
फक्त निर्मळ सहवास ,
‘ मी आहे ‘ हा –
डोळ्यातून मिळणारा विश्वास.
प्रेमाला नसावी अल्पही ,
भिती परस्परांची ,
न यावी संवादा ,
अडखळ कधीही शब्दांची.
धांडोळा घ्यावा मनाच्या ,
सुखात रमल्या प्रेमाचा ,
सापडेल मग खचित सुर तो ,
घरातल्या त्या नात्यांचा.
अखेर प्रेम म्हणजे-
सांभाळून घेणं असतं दुसऱ्याला ,
थोडं तुझं थोडं माझं ,
मग कुणीच नको रुसायाला.
सांभाळा इतकं अलवार
मग प्रेम लागेल रुजायाला
प्रेमाच्या वर्षावात सज्ज होऊया ,
चिंब चिंब भिजायाला.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply