नवीन लेखन...

व्यथा एका शेतकऱ्याची

कोणी म्हणे बाप माझा शेतकरी,
झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी,
घेवून वाड वडिलांची आण,
बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण..

जवान मरतो देशासाठी,
लाभते त्यास वीरमरण प्राप्ती,
मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी,
तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी…

अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई,
निसर्ग कोपाची भलतीच घाई,
उजाड माळरान फाटकी धरती,
कळोखांचा नभ डोळ्यांनभावती…

मान- सन्मान- सत्ता नाही,
काळी काया, हाडावर मुठभर मांस नाही,
मजसाठी नाही राजा कोणी,
छळवाद मांडला माझ्या भाळी…

पोशिंद्याची उपमा मला,
जय जवान जय किसान नारा,
जरी स्वातंत्र्य मिळाले देशाला,
तरी पारतंत्र्यात जगतोय माझा बळीराजा….!

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..