सुमुद्राच्या झाल्या खाड्या,
त्यातच फिरती शिडांच्या होड्या !
समुद्रात सर्वत्र प्रदुषण फार,
जाळ्यात मासे कमी, घाणच फार !
इमारतींच्या सांडपाण्याचे सर्वत्र जाळे,
नद्यांची झाली गटारे आणि नाले !
नाल्यांवर उभे अनधिकृत इमले,
अस्वच्छतेने सर्वांस घेरले !
तळ्यांची झाली डबकी,
सांगा त्याला कोणाची चुकी ?
प्रदूषणाने घेरली आमची वस्ती,
अशीच आमची चलता है वृत्ती !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
Leave a Reply