ह्याचा मध्यम उंचीचा सुगंधी वृक्ष असतो. त्वचा २-५ सेंमी जाड,धुरकट रंगाची उभ्या भेगा असलेली असते.गाभा धुरकट व त्यावर काळे डाग असतात.पाने संयुक्त व १५-३० सेंमी लांब असतात.पर्णदल ५-११ किंवा ७-९ ह्या जोडीत असतात.हि ८-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद असतात व पुष्प एकलिंगी असून ६-१२ सेंमी लांब असते.फळ गोल कठिण कवचाचे व कवचावर उभ्या रेषा असलेले असून फलमज्जा मेंदूच्या आकाराची असते.हिचा उपयोग खाण्याकरिता होतो.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व बीज तेल. अक्रोड चवीला गोड,उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो.हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)अक्रोडाची फलत्वचा हिरड्यांच्या मजबूतीसाठी दंतमंजनार्थ वापरतात.
२)सुकी खोकली येत असल्यास अक्रोडाची फलमज्जा भाजून देतात.
३)अक्रोड बल्य असल्याने अशक्तपणा मध्ये उपयोगी आहे.
४)अक्रोडाचे फलत्वचा चुर्ण रक्तस्तंभक म्हणून उपयुक्त आहे.
५)अक्रोड फलमज्जा मस्तिष्क बल्य आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar