नवीन लेखन...

कचऱ्याचे व्यवस्थापन

घरगुती कचऱ्यात काय काय असते?

फळांच्या साली, भाज्यांचे देठ, पालेभाज्यांची खराब पाने, शिळे अन्न, कागद, रबराच्या वस्तू किंवा खेळणी, काचेच्या वस्तू, फ्लॅस्टिकच्या पिशव्या, कपडे, धातुच्या आणि इतर वस्तू इत्यादी. यातील फळे, भाज्या आणि अन्न हा सगळा ओला आणि कुजणारा कचरा आहे. बाकी सगळा कचरा कोरडा असून तो न कुजणारा असतो.

एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते.

आपण घरातल्या कचऱ्याच्या डब्यात सगळा कचरा एकदम टाकतो आणि त्यावर झाकण घालतो. त्यामुळे कचरा कुजतो. यात फळे, भाज्या, अन्न या गोष्टींशिवाय कागद,कापड या गोष्टीसुद्धा कुजू लागतात. कुजत नाही ते फ्लॅस्टिक, धातू, काच, रबर इत्यादी. पण कुजलेल्या वस्तुंमुळे घाणेरडा वास सुटतो, दुर्गंधी पसरते आणि त्यामुळे एकूणच कचऱ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा तिरस्करणीय असतो.

पूर्वी मुंबईत महानगरपालिका रस्त्या-रस्त्यावर कचऱ्याची पेटी ठेवत असे. त्यात जवळपासचे सगळे लोक आपापला कचरा आणून टाकत. दिवसातून एकदा किंवा दोनदा महानगरपालिकेची गाडी येऊन तो कचरा उचलून घेऊन जात असे. पण लोकांच्यात सामाजिक शिस्त नसल्याने यातील बऱ्याचशा पेटयात कचरा न टाकता लोक पेटीच्या आजुबाजुलाच टाकत असत. आता त्यात फरक पडला असून महानगरपालिकेने या पेटया काढून टाकल्या असून प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांना चाकावर फिरणारी एकेक छोटी पेटी दिली आहे. यात लोकांनी दिवसभर कचरा टाकावा आणि महानगरपालिकेची गाडी रोज प्रत्येक सोसायटीच्या दारी येऊन तो कचरा उचलून नेते. यामुळे रस्त्यावरची दुर्गंधी कमी झाली, कचरापेटीभोवतालची घाण संपली आणि तितक्या प्रमाणात शहर स्वच्छ झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..