नवीन लेखन...

कथिल पाणी

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल (Tin) हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बर्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?  २०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कलही केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळ्याच्या भांड्याला कलहीकरून वापरली जात होती.त्यामुळे कलहीच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही. म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घन बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

Ø  हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.

Ø  एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कलहीच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट हि मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.

Ø  माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.

गेली सतरा वर्षे मी पितळी पट्टीला दोन्ही बाजूला कल्हई करून लोकांना देत आहे व ती पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून गार केलेले पाणी पिऊन त्यांना फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

(आमच्या पूर्वजांनी ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?)

— अरविंद जोशी
BSc
९४२१९४८८९४

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

14 Comments on कथिल पाणी

  1. महत्वपूर्ण माहिती मी गोरेगाव मुंबई येथे राहते मला कथिल हवे आहे कुठे मिळेल , कोणाला माहिती असल्यास कळवा , सर किडनी स्टोन बद्दल सुद्धा माहिती द्या ना ,

  2. माहिती उपयुक्त आहेच पण कथील किती आकार, वजनाची आणून कोणत्या भांड्यात किती पाणी घालून किती वेळ उकळावे व ते किती प्रमाणात कोणत्या वेळी किती दिवस घेतले पाहिजे हे प्लीज सविस्तर कळविले तर बरं होईल, हा प्रयोग कोणीही करू शकतो का?

  3. कंदिल मिळु शकतं.2100रुपये किलो आहे.गोल आकारात पट्टी येते.पितळेची भांडी मिळतात त्या दुकानात चौकशी करावी.ती 2 इंचाचीपट्टी 50रुपयात मिळते साधारणपणे.ठाण्यात/दादरला भांडीवाल्यांच्या दुकानात अथवा कल्हई काढणार्यांच्या जवळ चौकशी करावी.

  4. Whats app वर लेख वाचला. मी कथिल आणले आणि सुरू केले, मला जास्त चांगला फायदा झाला. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार.
    कोणाला कथिल पाहिजे असल्यास मला फोने करावा.
    मो.नं. ९९२२०६९९२३

    • मी पुण्यात राहतो माझा फोन no. 9850661902आहे माला कथिल हवे आहे तरी कथिल कुठे मिळेल तें कृपया सांगाल का?

        • मला पायधुणी पोलिस स्टेशनच्या बाजुच्या गल्लीत मिळाले

    • नमस्कार दिलीपजी !
      मी आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय परंतु फोन connect होत नाहीये. अन्य कोणता संपर्क क्रमांक असल्यास कृपया कळवावा.

  5. मला कंदिलांची पार्टी मिळेल का?किंवा माझ्याकडं कथिल आहे ते उकळून पाणी पिऊ शकतो का

  6. कथिल मला डोंबिवलीत मिळू शकेल का? कोणाकडे मिळू शकेल

  7. नमस्कार,
    आपला लेख अत्यंत महत्त्वपूर्ण व जुन्या गोष्टींचे महत्त्व कसे कालातीत आहे ते समर्थपणे विशद करणारा आहे.
    मला ही कथिल धातूची पट्टी कशी मिळू शकेल
    माझा मो क्र ९८६९६४९९५४

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..