पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन सामावलेलं आहे असं म्हटलं तर ते खोटं ठरू नये. पाणी हेच जीवन होय! आणि तरीसुद्धा याच पाण्याला आपण आपल्या रोजच्या जीवनात गृहितच धरतो, नाही का? स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला जर सहजासहजी उपलब्ध होत असेल ना, तर खरोखरंच आपण स्वतःला अत्यंत नशीबवान समजलं पाहिजे कारण जगात, दर सहा जणांमधील एकाला शुद्ध पाणी सहजपणे मिळू शकत नाही.
विश्व स्वास्थ्य संघटना ‘डब्ल्यूएचओ’ या संघटनेच्या २००७ च्या अहवालानुसार अतिसाराच्या चार कोटी रोग्यांमधील ८८ टक्के रोग्यांना अशुद्ध पाणी आणि अस्वच्छता यामुळे हा आजार होतो तर १.८ लाख रोगी अतिसार आणि संबंधित आजारामुळे दरवर्षी दगावतात. आपल्या लक्षात आलंच असेल, की पिण्याचे शुद्ध पाणी ही मनुष्याची एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. शासनातर्फे जो पाणीपुरवठा आपल्यास होतो, त्या पाण्याचे शुद्धीकरण खालील प्रकारे केले जाते. प्राथमिक शुद्धीकरण-पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नातील ही सर्वप्रथम पायरी आहे.
पाण्यातील कचरा गाळून घेण्याच्या दृष्टीने केलेला हा उपाय म्हणाना! एका मोठ्या जाळीदार माध्यमातून पाणी गाळून घेतलं जातं. यामुळे छोटे मासे, किडे, पाने, काड्या आणि इतर कचरा काढून टाकण्यात मदत होते. यानंतर वाळू वापरून शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते ज्यामुळे पाण्यातील इतर विद्राव्य घनपदार्थ बाजूला केले जातात.
तुरटीचा वापर वरील प्रयत्नानंतर पाण्यात तुरटी फिरविली जाते. यामुळे बारीक कण, जिवाणू इत्यादींचा एक चिकटसा थर तयार होतो आणि तो जड झाल्यानंतर पाण्याच्या तळाशी जातो. अर्थातच हा गाळ काढल्यानंतर पाणी अधिक स्वच्छ होतं. जंतुनाशकाचा उपयोग-पाण्याच्या शुद्धीकरणातील अजून एक पायरी म्हणजे पाणी
जंतूविरहित बनविणे. याच सूक्ष्मजंतूंमुळे अनेकदा कुतूहल विज्ञान जनहिताय विषमज्वर, हगवण, पटकी, ताप, असे आजार होण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच या जंतूंचा नाश आवश्यक आहे. मराठी विज्ञान परिषद क्लोरीनचा उपयोग- पाण्याचा मोठा साठा असल्यास शुद्धीकरणासाठी पाण्यात क्लोरीनचा वापर करणं सोयिस्कर ठरतं. क्लोरीनमुळे पाण्यातील जंतूंचा नाश केला जातो. नेमकं तेवढंच क्लोरीन पाण्यात घातलं जातं, की जेवढ्यामुळे पाण्याचं शुद्धीकरण होऊन ते मानवी शरीराला अपायकारकही ठरणार नाही.
दीप्ती सांगलेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply