आई न होणे हा स्त्रीच्या आयुष्यात किती दु:खद असते हे फक्त ती स्त्रीच जाणू शकते. स्त्रीला मुल नको होण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यातील एक म्हणजे पीसीओज् (poly cystic ovary syndrome) ज्यात मासिकपाळी रेग्युलर येत नाही.
September हा महिना पीसिओज अवेअरनेस म्हणून साजरा केला गेला. त्याचे ऒचित्य साधून हा लेख लिहित आहे.
पीसीओज् स्त्रीला गर्भ निरोधक गोळ्या दिल्यास किंवा जीवनशैलीत बदल केल्यास त्याचा फरटीलीटी वर काय परिणाम होतो हे ह्या संशोधाकांनी तपासण्याचे ठरवले. सध्या अशा पीसीओज स्त्रीयांना मासिकपाळी रेग्युलर होण्यासाठी गर्भ निरोधक गोळ्या दिल्या जातात. थोडक्या कालावधीसाठी ह्या गोळ्या दिल्यास त्या फरटीलीटी वाढवतात असे आधीचे प्रयोग दाखवतात. पीसीओज स्त्रीने वजन कमी केल्यास आणि व्यायाम केल्यास अशा स्त्रीया गरोदर राहण्याचा शक्यता बळावते असे नवीन शोध प्रबंधात आढळले आहे.
ह्या प्रयोगात त्यांनी १८ ते ४० ह्या वयोगटातील १४९ स्थूल किंवा लठ्ठ स्त्री, जिला पीसीओज् चा त्रास आहे अशाच स्त्रीयांची निवड केली. ह्या सर्व स्त्रीयांना ३ गटात विभागले. काही स्त्रीयांना गर्भ निरोधक गोळ्या दिल्या तर काहीजणीना जीवनशैलीत बदल करण्यास सांगितले तर उरलेल्या स्त्रीयांना दोन्ही गोष्टी करण्यास सांगितले व हे जसे सांगितले आहे तसेच ते ४ महिन्यांसाठी चालू ठेवण्यास सांगितले. आहार, व्यायाम आणि वजन कमी करण्यासाठीची औषधे ह्या सर्वांचा समावेश जीवनशैलीत बदल ह्या सदरात केला होता.
४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर प्रत्येक सहभागी स्त्रीला पुढील ४ महीने औषधे देऊन ओव्ह्यूलेशन सायकलस येतील असे बघितले.
शोध प्रबंधात असे आढळले की गर्भ निरोधक गोळ्या दिलेल्या ४९ स्त्रीयांपैकी फक्त ५ स्त्रीयांनी अपत्य प्राप्तीचा आनंद अनुभवला तर दोन्ही गोष्टी करणार्या ५० स्त्रीयांपैकी फक्त १२ स्त्रियांनी अपत्य प्राप्तिचा आनंद अनुभवला. पण सर्वात अधिक म्हणजे जीवनशैलीत बदल करणार्या ५० पैकी १३ स्त्रियांनी अपत्य प्राप्तीचा आनंद मिळाला.
ह्या शोध प्रबंधावरून असेच दिसते की गर्भ राहण्याचा आधी जर वजन कमी झाले तसेच ह्या स्त्रियांनी व्यायाम केलास अशा स्त्रीयांची मेटाबॉलिक व प्रजनन क्षमता सुधारते. स्थूल व लठ्ठ पीसीओज् स्त्रीने प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी नुसत्या गर्भ निरोधक गोळ्या घेण्याऐवजी फरटीलीटी सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे त्यांना जास्त लाभदायक ठरेल
हा शोध Journal of Clinical Endocrinology & Metabolism 2015 मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
Leave a Reply