सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला.
साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले. २००८ मध्ये त्यांना याच साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. त्यांची‘पार्थो आलो’ आणि‘पूर्बो-पश्चिम’ ही पुस्तकेही प्रचड गाजली. त्याच्या ‘प्रतिध्वनी’ या कादंबरीवर सत्यजित रे यांनी सिनेमाही काढला होता.
गंगोपाध्याय यांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातीलबंगालमधील जागृतीवर ‘प्रथम आलो’ (पहिला प्रकाश)ही प्रदीर्घ अशी दोन भागांमधील कादंबरी लिहिली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ ठाकूर आदी पात्ररुपात या कादंबरीत असून या कादंबरीचा मराठीअनुवाद ‘पहिली जाग’ या नावाने रंजना पाठक यांनी केला आहे.
त्यांच्या ‘सेई समय’ या ग्रंथाला १९८५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते तसेच त्यांना हिंदू साहित्यिक पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
सुनील गंगोपाध्याय यांचे २३ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply