नवीन लेखन...

हितचिंतक

एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,”थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल”.मी थांबलो,अन काय आश्वर्य खरेच वरुन एक आख्खीच्या आख्खी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वळून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजूबाजूसही लोकं अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.

असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो.हातात हिने खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या होत्या.ही बरीच मागे आपली पर्स सांभाळण्यात गुंतली होती.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवशीचा आवाज ऐकू आला,”थांब,एक पाऊलही पुढे टाकू नकोस.एका ट्रकचा ताबा सुटलाय अन तो लाल दिवा तोडणार आहे”.अन खरंच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.

मी हडबडलो.तू कोण आहेस? मी जोरात म्हणअलो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज मला माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,”तू कोण आहेस?”

तो म्हणाला,”तुझा मित्र,हितचिंतक,तुझ्या प्रारब्ध!”

मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,”थँक यू!”

तो जडावलेल्या स्वरात म्हणाला,”वेलकम”

मी रडत रडत प्रश्न केला,”खूप ऊशीरा भेटलास रे!,मी लग्न करताना कुठे होतास?”

तो रागात म्हणाला,”तो थेरडा भटजी माईकवर एवढ्या जोराजोरात मंगलाष्टके म्हणत होता की माझा आवाज तुझ्या कानांशी पोचण्या आधीच विरुन गेला!!!”

— सुमित्र श्रीधर माडगूळकर

Avatar
About सुमित्र माडगूळकर 8 Articles
महाकवी ग.दि.माडगूळकर यांचे नातू. गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते. गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती. जोगिया या सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने काढलेल्या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..