( बर्याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद )
विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ?
अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ?
विजय – अरे ! कसं काय ? फेसबुकवर तू गोव्याला काढलेले फोटो ‘अपलोड’ नाही का केलेस ? तेच मी पाहिले .
अजय – अच्छा ! ते तू पाहिलेस का ?
विजय – अरे ! तू गोव्याला जावून नक्की केलस काय ? तू ना दारू पित, ना मच्छी मटन खात , ना तुला पोहता येत, तिकडे जावून काय समुद्रावर कविता वगैरे लिहल्यास की काय ?
अजय – अरे ! तुला कोणी सांगितल की फक्त दारूडेच जातात गोव्याला सहलीला ? गोव्याला इतरही बर्याच गोष्टी आहेत की पाहण्या सारख्या.
विजय – हो ! आहेत ना अर्धनग्न स्त्रिया समुद्राच्या किणार्यावर उन खात पडलेल्या, पाहिला तुझा फोटो पाहिला समद्र किणार्यावर त्या अर्धनग्न पाश्चात्य तरूणीसोबत काढलेला.
अजय – हो ! त्या अर्धनग्न तरूणीमुळेच माझा पाश्चात्य संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्या फ्क्त शरीराने अर्धनग्न असतात पण मनाने निर्मळ आणि पवित्र असतात पण आपण मनाने आणि दृष्टीनेच अर्धनग्न असतो. अश्लीलता आपल्या नजरेत भरलेली असते ती अर्धनग्न तरूणी किती सहज गोड हसत माझ्या सोबत फोटो काढायला उभी राहिली होती. तिने माझ्या भावनांचा आदर केला होता तिच्या मनात तेंव्हा विचारही आला नाही की हया माणसाला कदाचित आपल्या अर्ध नग्नतेत रस असेल म्ह्णून. आज तिच्यासोबतचा फोटो मी पाहतो तेंव्हा चुकूनही माझे मन तिच्या अर्धनग्नतेकडे नाही तर तिच्या चेहर्यावरील निरागस आणि निर्मळ हस्याकडे आकर्षित होते.
विजय – आता तुला पाश्चात्य संस्कृती आवडायला लागलेली दिसतेय ?
अजय – संस्कृती पाश्चात्य काय आणि भारतीय काय ? ती फक्त माणणार्यांसाठीच मह्त्वाची असते. मला माझ्या भारतीय संस्कृतीबद्द्ल नितांन्त आदर आहे म्ह्णूनच तर त्या फोटोत मी समुद्र किणार्यावरही पूर्ण कपडयात तिच्यापासून किंचित अंतर ठेवूनच उभा असलेला दिसतोय ना ? ती माझ्या संस्कृतीचा आदर म्ह्णूनच माझ्या सोबत फोटो काढायला तयार झाली होती उद्या ती माझ्या सोबतचा तिचा फोटो तिच्या देशात कोणाला दाखवेल तेंव्हा त्यांनाही आपली संस्कृती कळेलच की. मला फक्त इतकच वाटत ती जर आपल्या संस्कृतीचा आदर करत असेल तर मी ही तिच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा ! तिच्या संस्कृतीकडे अश्लिलता म्ह्णून पाहता कामा नये.
विजय – बरोबर आहे तुझ ! या दृष्टीने मी कधी विचारच केला नाही. आपण सतत पाश्चात्य संस्कृतीकडे अश्लीलतेचा चष्मा लावूनच पाहतो त्यामुळे आपल्याला त्यांच्या संस्कृतीतील फक्त अश्लीलताच दिसते. त्यांना जर आपल्या भारतीय संस्कृतीबद्द्ल आदर वाटत असेल तर आपणही त्यांच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा !
अजय – आता कसं बोललास ? प्रत्येक संस्कृती ही आपल्या जागी बरोबरच असते म्हणून आपली संस्कृती सोडून दूसर्या संस्कृतीचा स्विकार करणे योग्य होत नाही पाश्चात्य संस्कृतीचा आदर करणे आणि तिचा स्विकार करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दुसर्या संस्कृतीतील काही गोष्टीचा आपण स्विकार जरी केला तरी तो डोळसपणे करायला हवा !
विजय – हो ! तू अगदी योग्य तेच बोललास , चल आता निघूया मला घरी जायला उशिर झालाय !
( दोघेही टेबलावरून उटून हॉटेलच्या बाहेर पडतात.)
— निलेश बामणे
Leave a Reply