वाचून बघ किंवा होऊन बघ
मग कळेल, पुस्तकाने उत्तर दिले.
कपाटात रहातो म्हणून कमी समजू नका.
वाचता वाचता झोप आली की
तसेच छातीवर किंवा डोळ्यावर
ठेवून बघा.
अनेकांना मी हवा असतो
वाचकांना वाचण्यासाठी
कपाटांना कधी कधी सजवण्यासाठी
तर काहींना ढापण्यासाठी
पुस्तके ढापणारी मंडळी पण
मजबूत असतात….तरबेज असतात…
कोणी ज्ञानासाठी ढापते
तर कोणी अज्ञान झाकण्यासाठी..
पुस्तकाप्रमाणे मजकूरही ढापला जातो…
अगदी लहान ‘ C ‘ त्याचे रक्षण करतो म्हणे.
एक मात्र मानावे लागेल पुस्तक आहे
म्हणून जग ज्ञानी आहे हे नाकारता येणार नाही.
त्या पुस्तकात काय नसते राव…
सर्व काही
लेखकाचे हुंदके,आनंद, अश्रु
आणि हो
डुबवलेले मानधनही..
प्रकाशक, समीक्षक आणि पुस्तक
याचें नाते इतके घट्ट असते की त्याला
उपमा नाही…लेखक पण असतोच
अर्थात लेखकाचे, कवीचे हुंदके समीक्षकांला का समजत नाहीत ?
तरी सर्व काही असून नसून पुस्तके अजिक्य आहेत.
आजच्या इ बुक ने मात्र त्याला धक्का दिला हे निश्चित.
कपाटातून त्याला काढले आणि अँप मध्ये फिट केले.
हजारो पुस्तके, लाखो शब्द खिशात ठेवून वाचक फिरत आहे.
खरे तर पुस्तकाची जागा कपाटातच
खिशात नाही असे आता म्हणता येणार नाही.
माझ्या कपाटातील पुस्तके हातात येतात
टेबलावर अस्ताव्यस्त पडतात तेव्हा
एक वेगळेच अस्तित्व खोलीत, मनात असते…
पण कधीकधी त्या खिशातल्या पुस्तकाचा मोह होतोच होतो..
तरीपण एक मन सांगते पुस्तकेच श्रेष्ठ ?
अर्थात ई बुक देखील ?
काळच श्रेष्ठ असतो…
सतीश चाफेकर
Leave a Reply