भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झंडा” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या 75 व्या वर्ष निमित्त लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारत सरकारचे ‘हर घर तिरंगा’ हे एक अभियान आहे.
तिरंगा घरी आणून फडकवावा ही एक व्यक्तिगत बाब नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे . लोकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे.
हर घर तिरंगा अभियान चा कालावधी किती आहे :
हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त वर्चुअल स्वरूपात खाली दिलेल्या वेबसाईटवर पिन करून झेंडा फडकवून त्यासोबत एक सेल्फी काढून पोस्ट सुद्धा करू शकतो.
हर घर तिरंगा अभियानात ऑनलाइन भाग घेण्यासाठी पद्धत :
- हर घर तिरंगा ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
- पुढे जाण्या आधी आपल्या मोबाईल चे लोकेशन ऑन करा.
- पिन ए फ्लॅग बटन वर क्लिक करून प्रवेश करा.
- नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, व फोटो अपलोड करा.
- नंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा
- नंतर फ्लॅग वर पिन करा.
- तुमचा फ्लॅग पिन झाल्याबरोबर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल .डाउनलोड करून ते तुमच्या सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता.
प्रत्यक्ष अभियानात भाग घेण्यासाठी हे करा :
हर घर अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट पासून लोकांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.
- अमृत महोत्सवी अभियान प्रत्यक्षात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान असेल.
- झेंडा फडकवताना झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
- फ्लॅग कोड ऑफ इंडिया च्या नियमांतर्गत येणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
- या नियमानुसार झेंडा उलटा किंवा जमिनीला लागून नसावा.तसेच सिंगल फ्लॅग पोल वर झेंडा फडकवू नये.
- तिरंग्याला रुमाल स्वरूपात किंवा शरीराला लपेटून वापर करू नये.
इन्स्टाग्राम वर हर घर तिरंगा फिल्टर कसा वापरावा :
- इन्स्टाग्राम अँप ओपन करा
- @amritMahotsav च्या प्रोफाइल वर जा
- bio मध्ये दिलेल्या लिंक ला ओपन करा
- रेकॉर्ड वर प्रेस करा आणि ध्वज साठी स्क्रीन वर टॅप करा
- आपली स्टोरी / पोस्ट ला #HarGharTiranga सोबत पोस्ट करा
- स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या प्रोफाइल पिक्चर वर लावा
हर घर तिरंगा अभियानानिमित्त महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे
जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा :
हर घर तिरंगा अभियानाचा व्हिडीओ :
Leave a Reply