नवीन लेखन...

‘रेझोनांस’ म्हणजे काय ….?

What is Resonance ?

“रेझोनांस” म्हणजे काय ….? आणि त्याची शक्ती काय आहे

मित्रानो

सोशल मिडीयावर एप्रील मे मध्ये एक मेसेज खुप व्हायरल झाला होता

सर्वानी एक प्रार्थना करा किंवा आशी चर्चा करा यांदा खुप पाऊस पडनार आहे व त्या पद्धतीचे मेसेज फाँरवर्ड करा

त्या मागचा वैदिक विचार एव्हढाच होता की पोझिटिव्ह एनर्जी तयार होऊन पावसासाठी पोझिटिव्ह वातावरण तयार होईल

आणी तसेच होऊन आज चोहीकडे छान पाऊस पडतोय

पूरातण वैदीक पद्धती या विज्ञानावरच आधारीत आसुन या मध्ये पोझिटिव्ह लहरी निर्मान होऊन मनुष्य जिवनाला त्याचा फायदाच होतो

आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करत असतो, उपासना करत असतो तेव्हा त्या उपासनेला व्यष्टी अथवा व्यक्तिगत केलेली उपासना म्हणतात. ही उपासना नित्य म्हणजे प्रतिदिन [ अरबी फारसी शब्द “रोज” ] केली जाणारी प्रार्थना, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केली जाणारी उपासना हे यातले मुख्य दोन प्रकार आहेत. हेच दोन्ही प्रकार समष्टी म्हणजे सामुहिक प्रार्थनेला सुद्धा लागू होतात. पण सध्या हिंदू बांधव सामुहिक प्रार्थना करणे विसरले आहेत. आणि कधी केलीच तर ती आरतीच्या स्वरूपात. आणि तीही आरडा ओरडा करत, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे शब्द म्हणत. हिंदू प्रार्थनेला एकत्र येत नाहीत ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे.

सर्वप्रथम आपण रेझोनांस म्हणजे काय ते पाहू. रेझोनांस….अर्थात एका वस्तूचे, अणूचे किंवा कोणत्याही एका गोष्टीचे स्पंदन दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जुळणे याला रेझोनांस असे म्हणतात.

१] मायक्रोवेव्ह च्या फ्रिक्वेन्सी बरोबर अन्नातील पाण्याची फ्रिक्वेन्सी जुळवली जाते आणि रेझोनांस उत्पन्न होऊन उष्णतेची निर्मिती होते आणि अन्न शिजते.

२] रेझोनांसचे हेच तंत्र संगीतातही वापरले जाते. ज्या वेळेस दोन तारांच्या कंपन पावणाऱ्या Frequency किंवा वारंवारीता जुळते त्या वेळेस दुसरीही तार आपोआप कंप पावू लागते.

३] MRI अर्थात Magnetic Resonance Imaging या तंत्रज्ञानातही रेझोनांसचाच वापर केला जातो. पेशंटला ज्या Scanner खाली झोपवतात तो Scanner पृथ्वीच्या Magnetic Field ८००० पट जास्त शक्तीचे Magnetic Field उत्पन्न करतो. पेशंटच्या शरीरातील हायड्रोजनचे अणूतील Protons या MF बरोबर अलाईन होतात म्हणजे MF च्या प्रमाणे जुळवून घेतले जातात. नंतर जेव्हा Redio -Frequency त्यांच्यावर सोडली जाते त्यावेळेस हे Protons MF च्या उभ्या दिशेत फिरायला लागतात. आणि Protons ची ही सगळी माहिती Redio -Frequency च्या Coil कडे पाठवली जाते. ह्या Protons चे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीतील वर्तन हे वेगवेगळे असते. हे Protons पाण्यात मेद किंवा चरबीपेक्षा कमी वेगाने शांत होतात. ही माहिती साठवली जाते, ताडून पाहिली जाते आणि मग पेशंटला काय विकार असेल त्याचे निदान केले जाते.

आता आपण धर्मातील रेसोनांस कडे वळू.

जेव्हा भजन, प्रार्थना, उपासना यासाठी एका विशिष्ट देवाच्या मंदिरात, विशिष्ट गुरुंच्या दरबारात एका भावनेने जमलेले लोक प्रार्थना करतात तेव्हा तेथे जितके लोक असतील त्यांची शक्ती कमी न होता ती भूमिती श्रेणीने एकमेकांना मिळते. अर्थात ती १+१= २ अशी वाढत न जाता तेथे चार जण प्रार्थना करत असतील तर ४*४=१६ म्हणजे चार चोक सोळा पटीत वाढत जाते. याचा एकत्रित प्रार्थना करणारयांना इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतो. याच तत्वाचा काही धर्मांमध्ये फार सुंदर उपयोग करून घेतला आहे. हिंदू धर्मातील आरतीमध्ये हेच अपेक्षित आहे. परंतु त्यात भक्तीपेक्षा गोंधळ आणि चुकीच्या आरत्या म्हणणे यामुळे फायदा होताना दिसून येत नाही. ओम सहनाववतु …..या प्रार्थनेत एकत्र येऊन कार्य करण्याविषयीच सांगितले गेले आहे. त्यात ऋषी म्हणतात की आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, एकत्र भोजन करू, एकत्र कार्य करू आणि एका विद्वेषरहित समाजाची निर्मिती करून खूप मोठी कार्ये पार पाडू. पराक्रम करू. ही शिकवण आज आपण विसरलो आहोत. रस्त्यावरून जाता जाता एका हातानेच देवाला नमस्कार करून आपण आपले “कर्तव्य” पार पाडायला लागलो आहोत.

मन:शक्तीच्या परमपूज्य श्री विज्ञानानंदांनी [ पूर्वाश्रमीचे श्री. भिडे ] रेझोनांसचे फार छान उदाहरण दिले आहे. एकदा अमेरिकेतील एका शहरात लष्कराचे संचलन चालू असते. आणि हे संचलन करता करता हे जवान एका लष्करी पुलावरून जावू लागतात. आणि हा शक्तिशाली पूल जो प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही पडला नाही तो या एका सुरात, एका तालात, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या सैनिकांच्या संचलनाने पडला. यातही कारणीभूत आहे हा रेझोनांसच …….
मला असे नेहमी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना कोणीच मडके दिले नाही तेव्हा स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा हे रेझोनांसचे तत्व किंवा शरीरातील स्थिर विद्युत यापैकी कशाचा तरी वापर केलेला असावा. स्थिर विद्युत निर्माण होताना त्या विद्युत निर्माण करणारया वस्तुत उष्णता निर्माण न होता ती जी वस्तू जवळ आहेत त्यात होत असते. श्री ज्ञानेश्वर हे एक महान योगी होते. त्यांना हे अशक्य नक्कीच नव्हते. आपल्याला त्याचे कारण न कळल्याने तो चमत्कार वाटतो. तसेच ज्ञानेश्वरांचे स्वत:चे लग्न अर्थात विवाह झालेला नसूनही त्यांनी स्त्री, पुरुष, प्रणय, फुले, भुंगे अशा अनेक उपमा दिल्या आहेत. प्रेम प्रसंग आणि अशाच अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. फुलांच्या मनातले सांगितले आहे. ते त्यांना या सर्वांशी समस्पंद गती अर्थात रेझोनांस करता येत असल्यामुळेच होय. म्हणजेच ते इतर व्यक्ती आणि वस्तू यांच्याशी त्यांची स्वत:ची स्पंदगती जुळवू शकत होते.

मित्रांनो अशी ही शक्ती आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणणार आहोत का? मित्रांनो आपण भीमरुपी, रामरक्षा, तुळशीदासांचे बजरंग बाण, हनुमान चालीसा,, सप्तशती मधील काही मंत्र, गायत्री मंत्र मृतसंजीवनी मंत्र अशा अति शक्तिशाली मंत्रांचे एकत्रित पठण केले तर फार मोठी शक्ती निर्माण करू शकतो. नुसत्या चुकीच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा असे काही केले तर फार चांगले होईल. एक शक्ती संपन्न समाज निर्माण होईल.

Always B ++

जय हिन्द

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..